शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर खोडसाळपणा करणाऱ्यावर गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:17 IST

डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर चौकात प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

आॅनलाईन लोकमतवर्धा : डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर चौकात प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी बाबासाहेबांचे हस्ताक्षर न्याहाळत असतानाचे त्यांचे छायाचित्र वनश्री वनकर यांनी फेसबुकवर पोस्ट केले. यानंतर ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या पेजच्या अ‍ॅडमिनने छायाचित्रात खोडसाळपणा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँगे्रसने केली आहे.खा. सुप्रिया सुळे यांच्या छायाचिात बदल करून खोडसाळ पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. यातील कमेंट्समध्ये लगेच खोडसाळ केलेले छायाचित्र बदलण्यात आले. या खोडसाळ पोस्टमुळे खा. सुळे यांची बदनामी झाली असून देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या पेजच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रायुकॉने केली. याबबात पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना निवेदन दिले. सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, संजय कामनापुरे, डॉ. किशोर अहेर, अंबादास वानखेडे, धनराज तेलंग, सुनील भोगे, संदीप किटे, टी.सी. राऊत, राहुल घोडे, राहुल ढोक, संकेत निस्ताने आदी उपस्थित होते.चित्र प्रदर्शनावरून राजकारण करू नये-युवा रिफॉर्मिस्टची मागणीयुवा दी रिफॉर्मिस्ट युथ असोसिएशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन लावले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन संघटनेच्या प्रतिनिधींनी केले. कुठल्याही राजकीय पक्ष वा नेत्यांना बोलविले नाही. खा. सुप्रिया सुळे हल्लाबोल आंदोलनात असताना त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी वनश्री वनकर यांनी त्यांना माहिती दिली. या प्रसंगाचा फोटो सोशल मिडीयावर एडीट करून प्रसारित केला. याबाबत वर्धा शहर पोलिसांत तक्रार करताच फोटो डिलीट करीत माफी मागितली; पण असे प्रकार घडू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.