शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

दहा दिवसात अपघाताच्या कारणांचा अहवाल सादर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:02 IST

सर्वात जास्त अपघात कोणत्या रस्त्यावर, का होतात? त्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे? कोणत्या वाहनाचा, कोणत्या वाहनांमुळे जास्त अपघात होतो, मागील वर्षभरात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आदी बाबी विश्लेषणामध्ये घेण्यात याव्यात.

ठळक मुद्देरामदास तडस : रस्ता सुरक्षा समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी त्याच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. यासाठी पुढच्या १० दिवसात अपघात प्रवण स्थळांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या कारणांचे विश्लेषण करून अहवाल सादर करण्याचा सूचना खासदार रामदास तडस यांची दिल्यात.जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मुन , प्रणव जोशी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. सर्वात जास्त अपघात कोणत्या रस्त्यावर, का होतात? त्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे? कोणत्या वाहनाचा, कोणत्या वाहनांमुळे जास्त अपघात होतो, मागील वर्षभरात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आदी बाबी विश्लेषणामध्ये घेण्यात याव्यात. महामार्गावर वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची नियमित तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवीन रस्त्यांचे सर्वेक्षण करून अपघात प्रवण स्थळांचा शोध घेऊन त्यासाठी वेळीच उपायायोजना कराव्यात. तसेच हेल्मेट न घातल्यामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याचीही माहिती संकलित करावी. महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करून त्यांना दंड आकारावा. महामार्गावर अशी मोहीम महिनाभर राबविण्यात यावी आणि जनतेमध्ये याबाबत जनजागृती करावी. रस्त्याच्या कडेला माहिती व दिशादर्शक फलक दिसत नाहीत, सार्वजनिक बांधकाम विभागाने असे फलक तातडीने लावून घ्यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. नगर पालिका क्षेत्रामध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होतात त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करावी. यासाठी नियमांच्या आधारे जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा सूचना यावेळी यांनी दिल्यात. जिल्ह्यात ३९ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती खरमाटे यांनी दिली.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसAccidentअपघात