शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी महिलांचे वरुणराजाला साकडे

By admin | Updated: June 25, 2017 00:42 IST

सालोड (हि.) परिसरात गत आठ दिवसापासून पाऊस झाला नाही. रुसलेल्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी

ग्रामदेवतेची केली पूजा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सालोड (हि.) परिसरात गत आठ दिवसापासून पाऊस झाला नाही. रुसलेल्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सालोड (हिरापूर) येथील वॉर्ड २ मधील महिलांनी वरुणाला साकडे घालीत ग्रामदेवतेची पूजा केली. या भागात आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीच्या संकटाची भीती आहे. सुरूवातीला झालेल्या पावसामुळे अनेक सालोड (हि.) भागातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. उन्हाची दाहकता कमी राहिल्याने पेरलेले विविध बियाणे उगवले. परंतु, आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने उगवलेली पिके पाण्याअभावी माना टाकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊसाने आठ दिवसापासून रजा घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. रुसलेला वरुण राजा प्रसन्न व्हावा म्हणून वॉर्ड २ मधील महिलांनी एकत्र येत ग्रामदेवतेची पूजा केली. यावेळी सालोड (हि.) येथील वॉर्ड २ मधील लहान मुलांनी तसेच महिलांनी पाण्याची घागर डोक्यावर घेवून गावाला प्रदक्षिणा मारली. यावेळी गावात धोंडीही काढण्यात आली होती. या उपक्रमात मंगला सुपारे, शुभांगी लोणकर, छाया देवतळे, सुनंदा चाफले, भारती लोणकर, पद्मा गायधने, प्रेमिला हजारे, शोभा चाफले, आशा तळवेकर, कलावती हिवसे, उज्वला हिंगे, मनोरमा लोणकर, सुनीता सातपुते, रोहिणी जुडे, ज्योती पोहाणे, योगीता सातपुते, कांता जुडे, वर्षा हिंंगे, वर्षा वंजारी, अभिजीत तळवेकर, अनुज वंजारी आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला गावातील बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामदेवतेला नवैद्द दाखविण्यात आला.