लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात आ. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.वर्धा जिल्ह्यात असलेल्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याकडे तेथील कंपनी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. हा प्रकार शासन निर्णयाला फाटा देणाराच ठरत आहे. संबंधित अधिकाºयांना या बाबात माहिती दिली असता आम्ही बघतो असे म्हणत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. कुठलेही कारण न दाखविता काही कामगारांना कंपनीतून काढले जात आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्यात यावे. कंपनीत कर्तव्य बजावण्यासाठी येणाºयांना सुविधा व्हावी यासाठी बस सेवा सुरू करण्यात यावी. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे कवच देण्यात यावे. वेळीच कामगारांचे वेतन अदा करण्यात येत नाही. कामगारांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेच्या आत वेतन देण्यात यावे, आदी मागण्या पूर्णत्त्वास नेण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन स्विकारून आ. बच्चू कडू यांनी सदर प्रकरणी योग्य कार्यवाही व्हावी यासाठी थेट कामगार आयुक्त नागपूर यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली. शिवाय योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. निवेदन देताना प्रहारचे राजेश सावरकर, आकाश नरशिंगकर, अजय भोयर, विनोद राऊत, हेमराज पोहाणे, निमजे आदी उपस्थित होते.
कामगारांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 21:49 IST
वर्धा जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात आ. बच्चू कडू यांना निवेदन सादर करण्यात आले.
कामगारांच्या समस्या निकाली काढा
ठळक मुद्देकामगारांचे बच्चू कडुंना साकडे : कामगार उपायुक्तांना दिली फोनद्वारे थेट माहिती