शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रूग्णालयातील समस्या निघाल्या निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:01 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील समस्येबाबत १५ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता रूग्णालयात अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रूग्णालयाची पाहणी केली.

ठळक मुद्देमनसेच्या आंदोलनाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील समस्येबाबत १५ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता रूग्णालयात अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रूग्णालयाची पाहणी केली. त्यामुळे आता मनसेने आंदोलन स्थगित केले आहे.उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या अनेक गैरसोयीबाबत, तसेच रुग्णालयातील रुग्णांना सहन कराव्या लागणाºया नाहक त्रासाबाबत ११ जून रोजी मनसेने रूग्णालयावर धडक देवून वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर चिंचलकर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पूर्वी रुग्णांना क्ष-किरणचा अहवाल दोन दिवसानंतर दिला जायचा. त्यात सुधारणा झाली आहे. तो आता दोन तासात दिला जात आहे. तसेच रक्तासाठी अतिरिक्त शुल्क घेणे ही थांबविण्यात आले आहे.रुग्णांना जेवण पूर्णपणे देण्यात येत आहे. याशिवाय रुग्णालयात गैरहजर असणारे मलेरिया, टीबी, हत्तीरोग, नेत्र तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ नियमितपणे सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याची आर ओ मशिन सुरु करण्यात आली आहे. रुग्णास बीपी व शुगरच्या गोळ्या १५ पंधरा दिवसाच्या दिल्या जात आहे. रुग्णालयात पूर्वी एकच परिचारिका तीन तीन वॉर्ड सांभाळत होती. आता परिचारिकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. या साऱ्या बाबी मनसेच्या आंदोलनानंतर मार्गी लागल्या. त्यामुळे रूग्णांनी मनसेचे कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून उर्वरित समस्या लवकरच युद्धपातळीवर सोडविल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे मनसेने आंदोलन स्थगित केले आहे.वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली त्यावेळी डॉ. किशोर चिंचलकर यांच्या चर्चा केली. त्यांनी रूग्णालय प्रशासनाने समस्या सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगितले. तसेच रूग्णालयाच्या साफसफाईबाबत आश्वासन दिले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMNSमनसे