शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराच्या चवीतून मुख्याध्यापकाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:19 IST

शाळेत अध्यापनापेक्षा पोषण आहाराचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची आता शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे शुद्धीपत्रक : ताण कमी करण्याच्या दृष्टीने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळेत अध्यापनापेक्षा पोषण आहाराचीच अधिक काळजी वाहणाऱ्या मुख्याध्यापकांची आता शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीतून मुक्तता करण्यात आली आहे. यापुढे पोषण आहाराची चव घेऊन ते तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची राहणार नाही. याबाबत शिक्षण विभागाने शुद्धी काढल्याने शिक्षकांचा खुप मोठा ताण हलका झाला आहे.शालेय पोषण आहारासंदर्भातील २६ फेब्रुवारी २०१४ च्या परिपत्रकानुसार आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयंपाकी नंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी त्यानंतर मुख्याध्यापक किंवा योजनेशी संबधित शिक्षक या तीन स्तरावर घेऊन त्याची नोंद चव नोंद वहींमध्ये घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. आता यामध्ये नव्याने सुधारणा करून शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने आहाराची चव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी, मुख्याधापक किंवा योजनेशी संबधित शिक्षक यापैकी एकाने घ्यावी व त्याप्रमाणे चव नोंद वहीमध्ये घेण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी होणार असल्याने आता मुख्याध्यापक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. परिणामी शैक्षणिक गुणवत्ताही वाढीस लागणार.जबाबदारी निश्चित करावीपोषण आहारासंदर्भात काढलेल्या शिक्षण विभागाच्या शुद्धिपत्रकामुळे फार काही बदल होत नसले तरी फक्त मानसिक समाधान मुख्याध्यापकांना मिळेल. त्यामुळे अशी जबाबदारी कमी न करता ती निश्चित केली गेली तर खऱ्या अर्थाने मुख्याध्यापकांची यातून सुटका होईल आणि शाळेतील इतर कामांमध्ये वेळ मिळू शकेल, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.विषबाधा झाल्यास जबाबदार कोण?विद्यार्थ्यांची शारिरीक व बौद्धीक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. ही योजना राबवितांना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. या योजनेच्या तपासणीतून सध्या मुख्याध्यापक व शिक्षकांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी पोषण आहारातून विषबाधा झाल्यास नेमके कोणाला जबाबदार धरायचे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Schoolशाळा