शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या परवान्याची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:08 IST

आॅनलाईन लोकमतवर्धा : खाद्यपदार्थ विक्री करण्याकरिता असणाऱ्या हॉटेल खानावळींना त्यांचा व्यवसाय करण्याकरिता इतर विभागासह महसूल विभागाच्या परवानगीची गरज होती. वर्धेत जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून हा महसूल विभागाच्या परवानगीचा नियमच रद्द केल्याने हॉटेल व्यावसायिकांना काढाव्या लागणार असलेल्या परवान्याची संख्या सध्या कमी झाली आहे.राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी केला कायदा रद्द : हॉटेल व्यावसायिकांना दिलासा

आॅनलाईन लोकमतवर्धा : खाद्यपदार्थ विक्री करण्याकरिता असणाऱ्या हॉटेल खानावळींना त्यांचा व्यवसाय करण्याकरिता इतर विभागासह महसूल विभागाच्या परवानगीची गरज होती. वर्धेत जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून हा महसूल विभागाच्या परवानगीचा नियमच रद्द केल्याने हॉटेल व्यावसायिकांना काढाव्या लागणार असलेल्या परवान्याची संख्या सध्या कमी झाली आहे.राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार वर्धेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून हा परवाना रद्द केल्याचे पत्र निर्गमित केले आहे. त्यांच्या या पत्रानुसार १९६९ पासून असलेला महसूल विभागाच्या परवानगीचा हा नियम रद्द करण्यात आला आहे. हा नियम रद्द झाल्याने जिल्ह्यात असलेल्या हॉटेल व्यवसायावर असलेला महसूल विभागाचा वचक मात्र कमी झाला आहे. हॉटेल व्यावसायिक कधी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून होणाºया कार्यवाहीच्या दडपणातून मुक्त झाल्याचे यातून दिसून येत आहे.खानावळ अथवा हॉटेल सुरू करताना हॉटेल व्यवसायिकाला अनेक प्रकारचे परवाने घ्यावे लागत होते. यात इतर परवान्यासह उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या परवान्याची गरज होती. हा परवाना काढताना या व्यावसायिकाला अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करून परवाना घ्यावा लागत होता. शिवाय प्रत्येक वर्षी त्याचे नुतनीकरण करावे लागत होते. व्यवसायाच्या दृष्टीने इतर परवान्याच्या तुलनेत हा परवाना तितका आवश्यक नसल्याचे समोर आले. यामुळे राज्याच्या महसूल विभागाने हा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाच्या महसूल विभागाने हा कायदा रद्द केल्याने हॉटेलात होणाºया अनेक भोंगळ कारभाराला रस्ता मोकळा झाला आहे. घरगुती सिलिंडरचा वापर, खाद्य सामग्रीचा दर्जा आदि बाबींवर तालुका स्थळावर कोणाचेही नियंत्रण राहणार नसल्याने हॉटेलातून मिळणाऱ्या खाद्यपदार्थाबाबत विश्वासार्हता नसल्याचे यातून समोर येत आहे. महसुल विभागाचे अधिकार या नव्या नियमामुळे संपुष्टात आल्याने इतर विभागाची जबाबदारी वाढली असून त्यांच्याकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे.शॉप अ‍ॅक्टसह अन्न व औषधी विभागाचा परवाना गरजेचामहसूल विभागाचा परवाना जरी रद्द करण्यात आला तरी हॉटेल व्यवसाय करताना आवश्यक असलेला शॉप अ‍ॅक्ट आणि अन्न व औषधी प्रशासनाचा परवाना गरजेचा झाला आहे. शिवाय यातील काही कायदेही कडक करण्यात आले आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी इतर परवाने नियमानुसार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.जुन्या परवान्याच्या नुतनीकरणाचीही गरज नाहीजिल्ह्यात हॉटेलींगचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी पूर्वी महसूल विभागाचा आवश्यक असलेला परवाना काढला आहे. त्याचा कालावधी संपला आहे. आता हा कायदाच रद्द झाल्याने त्याच्या नुतनीकरणाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.हॉटेल व्यावसायिकांना महसूल विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक होते. मात्र राज्य शासनाच्या गृह विभागाने दिलेल्या सूचनेनुसार ही अट रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी इतर विभागाचे यापूर्वी आवश्यक असलेले परवाने कायम आहेत. यात काही नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी वर्धा.