शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत माळेगाव (ठेका)चे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:25 IST

पिढ्यानं पिढ्यांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने गरज असलेल्या माळेगाव (ठेका) गावाचे पुनर्वसन दहा महिन्यात होणार आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांचे ग्रामस्थांना आश्वासन : समस्यांमुळे नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : पिढ्यानं पिढ्यांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने गरज असलेल्या माळेगाव (ठेका) गावाचे पुनर्वसन दहा महिन्यात होणार आहे. त्यासाठी शासनाने समिती गठित केली असून समितीत गावकºयांचा एक प्रतिनिधी सुद्धा राहणार आहे. दहा महिन्यात गावाचे पुनर्वसन करण्यासंबंधी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाºयांना आदेश दिले आहे.येथील सरपंच प्रभाकर घाटोळ यांच्या नेतृत्वात आशिष काकडे, राजू बैस, संतोष साहू, राजू धरवार, प्रमोद मेटकर, मोरू निकोडे, लक्ष्मण बावणकर, विशाल साहू यांनी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून निवेदन सादर केले. येथील सर्व शेती ही जंगलव्याप्त भागात आहे. वाघ, बिबट या हिंस्त्र प्राण्यांसह रोही, रानडुक्कर या वन्य श्वापदांचा येथे मुक्त वावर आहे. त्यामुळे येथील शेती बिनभरवशाची झाली आहे. पिढ्यानपिढ्या इथला शेतकरी संघर्षाचे जीवन जगत आहे. शेतीला गोपालन हा जोड धंदा असल्याने कशी बशी दोन वेळची चटणी भाकरी तरी खायला मिळते. निव्वळ शेतीवर अवलंबून असते तर उपाशीपोटी मरावे लागले असते.येणीदोडका, गरमसूर या नावासोबत माळेगाव (ठेका) या गावाचे पुनर्वसन होण्याची अशा आता पल्लवीत झाली आहे. येथील रूग्णांना उपचारासाठी कारंजा, आर्वी, वर्धा, वा सेलूकडे जाणारे मार्ग जंगलातून जातात व दहा किमीत जंगल ओलांडूनच कोणत्याही दिशेला जावे लागते. इतकी बिकट स्थिती या गावाची झाली आहे. या सर्व बाबीबाबत वनमंत्र्यांना ग्रामस्थांनी अवगत केले आहे. गावाच्या पुनर्वसनाबाबत गठीत समिती शासनाला तसा अहवाल सादर करणार असल्याने पुनर्वसनाला मार्ग मोकळा होणार आहे.