शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना फटकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:11 IST

येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देकेंद्रीय समितीच्या सदस्यांकडून वर्धा रेल्वे स्थानकाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील रेल्वे स्थानकाची पाहणी केंद्रीय यात्री सुविधा समितीचे सदस्य इरफान खान यांनी मंगळवारी दुपारी केली. यावेळी त्यांनी सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांची पाहणी करताना नजरेत पडलेल्या अस्वच्छतेच्या कारणावरून अधिकाºयांना खडसावले. यावेळी त्यांनी प्रवाशांशी चर्चा केली.केंद्रीय यात्री समितीचे सदस्य इरफान खान यांनी प्रारंभी वर्धा रेल्वे स्थानक परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात आवश्यक त्या ठिकाणी कचरापेटी लावण्याच्या सूचना दिल्या. शिवाय त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात कुणीही थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास काय दंड होऊ शकतो याची माहिती नागरिकांना देणारे सूचना फलक लावण्याचे सुचविले. त्यांच्यासोबत भाजपा अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, प्रदेश सचिव बिस्मील्ला खान, शहर अध्यक्ष नवशाद शेख, अफजल खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी वर्धा रेल्वे स्थानक प्रमुख डी.एस. ठाकुर, टी.जी. पुष्पलवार, डी.एम. तिजारे, दिनेश सिंग आदींची उपस्थिती होती.बापू कुटीच्या प्रतिकृतीचे कौतुकवर्धा रेल्वे स्थानक परिसरात सेवाग्राम येथील बापू कुटीची प्रतिकृती लावण्यात आली आहे. त्याची पाहणी इरफान खान यांनी केली. याचे त्यांनी कौतुकही केले. त्यानंतर त्यांनी रेल्वे फलाटावर रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत एका महिलेशी संवाद साधला. सदर महिलेने अमरावती पॅसेंजर गत काही दिवसांपासून वेळेवर येत नसल्याचे सांगितले. त्यावर इरफान खान यांनी इंग्रजकालीन असलेल्या रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे प्रवाशांना त्रास होत असल्याचे सांगत प्रवाशांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी