शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

३५३ शाळांचा शाळा सुरू करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९४१ शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शाळा दरवर्षी २६ जूनपासून सुरू होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे नवीन शैक्षणिक सत्रावर विरजण पडले. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे शाळा व्यवस्थापन समितीने मंजुरी दिल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय दिल्याने जिल्ह्यातील १ हजार २९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यापैकी ९४१ ठिकाणी झालेल्या सभेत शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून ३५३ शाळांनी मात्र, शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले. मात्र, शालेय सत्र चालविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून निर्णय घेण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीला दिली.त्यानुसार २६ जून रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. यात व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.जिल्ह्यातील १ हजार २९४ शाळांमध्ये झालेल्या बैठकीत ३५३ शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला असून ९४१ शाळांनी शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली.कोरोनाचा फैलाव बघता पालकही आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतील की नाही, याबाबत साशंकताच आहे. तरी पुढील निर्णय व्यवस्थापन समिती घेणार आहे.शिक्षकांमधील संभ्रम कायमच१५ जुन्या शासन परिपत्रकात विद्यार्थ्यांसाठी शाळा भरविण्याचे वेळापत्रक देण्यात आले. परंतु, शिक्षकांनी मात्र नेमके कधी शाळेत जावे, याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. शिवाय गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे एका पत्राद्वारे सुचविले आहे. परिपत्रकातील तरतूदी लक्षात घेता काही पं.स.च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दररोज १० ते ५ या कालावधीत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या असल्याने शिक्षकांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील १,२९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक२६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका पडला नसला तरी जिल्ह्यातील एक हजार २९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. बैठकीत विविध विषायांसह शाळा सुरू करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. काही शाळा सुरू करण्याबाबत होकार देण्यात आला असला तरी पालक पाल्यांना शाळेत पाठवतील का, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Schoolशाळा