शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन कमी करा, अन्यथा मिटर काढून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:38 IST

भारनियमनात वाढ केल्याने नागरिक संतप्त आहेत. मांडगावच्या शेतकºयांनी शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देशेतकरी, ग्रामस्थांची विद्युत कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/मांडगाव : भारनियमनात वाढ केल्याने नागरिक संतप्त आहेत. मांडगावच्या शेतकºयांनी शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची मागणी केली. शेतकरी कार्यालयात धडकताच अभियंत्याची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी भारनियमन कमी करावे, अन्यथा १८ ही गावांतील मिटर काढून न्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत निवेदनही सादर करण्यात आले.सध्या भारनियमनाची समस्या सर्वत्र चर्चेत आहे. मांडगाव अंतर्गत येणाºया १८ गावांतील विद्युत ग्राहक, शेतकरी, विद्यार्थी सर्वांनाच याचा फटका बसत आहे. मांडगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालय शनिवारी संतप्त शेतकºयांनी धडक दिल्याने गजबजले होते. बावापूर, बोथुडा, किनगाव, मांडगाव येथील सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ वीज कार्यालयात पाहोचले. संतप्त नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. २४ तासांत केवळ १० तास वीज मिळते. वीज नसल्याने चिमुकल्यांना गर्मीमुळे अनेक आजार जडत आहेत. डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार जडत आहे. दहावीनंतरचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अभ्यास करणेही कठीण झाले आहे. घरात रात्री काळोखामुळे साप व इतर सरपटणाºया प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. या प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका झाला तर महावितरण जबाबदार राहिल, असा इशाराही देण्यात आला. शहरी भागात भारनिमयन कमी असते. तेथे माणसे राहतात तर गावात जनावरे राहतात काय, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला.ग्रामीण भागात किमान १४ तास वीज पुरवठा देता येत नसेल तर सर्व १८ गावांतील वीज पुरवठा खंडित करावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली. महावितरणने वीज न कापल्यास आम्ही स्वत: पाऊल उचलू, असा इशाराही नागरिरकांनी दिला.ग्रामस्थांना शांत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता पी.बी. उइके समुद्रपूर यांना मांडगाव उपकेंद्रावर बोलविण्यात आले. उपकेंद्रावरील तुमडाम, उईके, समुद्रपूरचे ठाणेदार आदींनी परिस्थिती हाताळली. भारनियमनावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन यावेळी शेतकºयांना देण्यात आले.