शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोर्ट चेकर’द्वारे गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी अशी पोलिसांची मागणी होती. कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्ट चेकर हे अ‍ॅप बनविले आहे. हे अप्लिकेशन बनविताना पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून वापर : चालता-फिरता गुन्हेगारांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस दलाने आधुनिकेतच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चालता-फिरता एखाद्या गुन्हेगाराची कुंडली पोलिसांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे. ‘कोर्ट चेकर’ या नव्या अप्लिकेशनमुळे हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात या अ‍ॅपच्या वापराला सुरुवात झाली आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करणे जेवढे अवघड, तेवढेच गुन्हेगारांचे रेकॉर्ड मिळवणे कठीण. मात्र, या अप्लिकेशनमुळे हे सोपे झाले आहे.रेकॉर्डबरोबर गुन्हेगारांवर न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची व तारखांची माहितीही मोबाईलवरच मिळणार आहे. राज्यच नव्हेतर देशातील पोलीस दलासाठी हे कोर्ट चेकर अ‍ॅप उपलब्ध झाले आहे. हे अ‍ॅप कसे वापरावे याबाबतच्या कार्यशाळाही ठिकठिकाणी घेतल्या आहेत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील किंवा परराराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती.न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी अशी पोलिसांची मागणी होती.कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्ट चेकर हे अ‍ॅप बनविले आहे. हे अप्लिकेशन बनविताना पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे अप्लिकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करून घेतल्यानंतरच त्याची डाऊनलोडची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलीस असला तरच अप्लिकेशनमध्ये साईन इन करता येणार आहे. ऑनलाईन व्हेरिफीकेशन झाल्याशिवाय हे अ‍ॅप वापरता येणार नाही....आरोपीचा फोटो टाकला तरी येणार रेकॉर्डकोर्ट चेकरमध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळु शकले, असे नवीन फिचर कोर्ट चेकर अ‍ॅपमध्ये टाकण्यात आले आहे.कोर्ट चेकर अ‍ॅप पुणे येथील एका अभियंत्याने विकसीत केले आहे. वर्धा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर या अप्लिकेशनचा वापर सुरु आहे. या अ‍ॅपमुळे आरोपींची जुजबी माहिती मिळण्यास मदत होत आहे.नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा.

टॅग्स :Policeपोलिस