शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जगातील पहिले प्राकृतिक जीवन विद्यापीठ होणार साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:42 IST

गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

ठळक मुद्देअनेक दिवसांची प्रतीक्षा पूर्णत्त्वास

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या विद्यापीठाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जगातील पहिले विद्यापीठ म्हणून याचे नाव लौकिक होणार आहे. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील एक विद्यापीठ म्हणून याचे नाव आहे.सेवाग्राम-करंजी मार्गावर आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने दिलेल्या जागेवर प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा या अभ्यासक्रम या विद्यापीठात करण्यात येणार आहे. या प्रकारातील विविध अभ्यासक्रम येथे सुरू होणार आहे. प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा प्रारंभ महात्मा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमातूनच केला होता. यामुळे या पद्धतीला विशेष महत्त्व आहे. येथे निर्माण होत असलेल्या या विद्यापीठाचे १५ रोजी वास्तुपूजन आणि उपचार पद्धतीने विद्यापीठाला प्रारंभ होणार आहेप्राकृतिक चिकित्सा समिती, राजघाट दिल्ली यांच्या अंतर्गत हे विद्यापीठ असून १ डिसेंबर २००७ रोजी खा. जनार्धन द्विवेदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होत. पण आर्थिक अडचणीमुळे अनेकदा बांधकाम रखडले. आर्थिक मदत जशी मिळाली तशी कामे व्हायला लागली. कामाना गती मात्र नव्हती. यामुळे गांधीवादींमध्ये शंका निर्माण होवून जीवन विद्यापीठ साकार होईल का ? असा प्रश्न होता. ऐवढेच नाही तर या विद्यापीठाला राष्ट्रपित्याचे नाव होते बापूंची श्रद्धा या चिकित्सेवर असल्याने विद्यापीठ बनलेच पाहिजे अशी भावना समितीची व गांधीजनांची होती. आता ती पूर्णत्वास आली आहे.इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक ते साहित्य येथे ठेवण्यात आले आहे. डॉ. प्रशांत तळवेकर आणि त्यांच्या दोन सहाय्यकांची नेमणूक झाली आहे. सर्व उपचार पद्धती या ठिकाणी देण्यात येणार आहे. आयुर्वेदिक बगीचा, सेंद्रीय शेती, निवासस्थाने आदिंची निर्मितीही येथे होणार आहे. नॅचरोपॅथी डिप्लोमा अ‍ॅण्ड डिप्लोमा फॉर योगा असा अभ्यासक्रमही येथे सुरू होणार आहे. भविष्यात याच ठिकाणी दवाखाना बनविण्याचा मानस असल्याचे समितीचे महामंत्री नारायणदास भट्टाचार्य यांनी सांगितले.