शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

प्रेमापोटी गाठली मुंबापुरी, गर्भात बाळ घेत परतली माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 17:07 IST

Love, Wardha News Social Media ज्याच्यावर विश्वास टाकून मुंबईत गाठली, त्यानेच विश्वासघात केल्याने अखेर मुलीला गर्भात बाळ घेऊन वर्धा गाठावे लागले.

ठळक मुद्देसोशल मीडियातून अशीही फसवणूकदोन दिवसांपूर्वी गोंडस बाळाला दिला जन्म

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्यात बी.एस.सीचे शिक्षण घेत असलेल्या युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईच्या युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत अन् नंतर प्रेमात झाल्याने युवकाच्या बोलावण्यावरून युवतीने जन्मदात्यांना अंधारात ठेवून थेट मुंबई गाठली. दोघेही सोबत राहू लागल्याने आठ महिन्यांच्या कालावधीत युवतीला गर्भधारण झाली. युवकाने आपली जबाबदारी झटकत तिला मानसिक व शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. ज्याच्यावर विश्वास टाकून मुंबईत गाठली, त्यानेच विश्वासघात केल्याने अखेर मुलीला गर्भात बाळ घेऊन वर्धा गाठावे लागले.

दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्मही दिला, पण खरा प्रश्न आहे, तो लग्नापूर्वीच बाळ जन्माला आल्याचा. समाज आता हे सत्य कसे पचवेल, याची चिंता जन्मदात्या माता-पित्यांना भेडसावत आहे.

आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने मुलीला बी.एस.सी.पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकू दिले. त्या मुलींनी आई-वडिलांपेक्षा थोड्या दिवसात फेसबुक फ्रेंड झालेल्या युवकावर विश्वास दाखवून कॉलेजमध्ये जात असल्याचे सांगत आपला फोन घरीच ठेवून ४ आॅक्टोबर २०१९ रोजी मुंबईचा रस्ता धरला. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने शोधाशोध सुरू केली. तिचे मित्र-मैत्रिणी, कॉलेज व नातेवाईकांशी संपर्क साधून विचारपूस केली. मात्र, काहीच पत्ता लागला नाही. अखेर पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

दिवसामागून दिवस लोटले मात्र, मुलीशी संपर्क झाला नसल्याने आई-वडिलाची चिंता वाढतच गेली. अशातच आॅगस्ट महिन्यात देवळी पोलीस ठाण्यातून आई-वडिलांना ‘तुमची मुलगी मिळाली आहे पण, तिची स्थिती खूप नाजूक आहे’ असा फोन आला. पोलिसांचे हे शब्द कानावर पडताच आई-वडिलांना मुलगी मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी इतरांनाही सांगत देवळी पोलीस ठाणे गाठले. मात्र, मुलगी गर्भवती असल्याचे त्यांना कळताच मोठा धक्का बसला. तिला विचारपूस केली तर ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. एकीकडे मुलगी मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे लग्नाशिवाय मुलगी गर्भवती असल्याचे वास्तव छळत असतानाही; शेवटी पोटचा गोळा दूर करणार तरी कसा, म्हणून तिला घरी घेऊन आले.

काही वेळ गेल्यानंतर तिला काहीही न विचारता आणि शेजाऱ्यांकडे दुर्लक्ष करून मोठ्या खासगी रुग्णालयात नेले. तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असून तिचा गर्भपात करता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता त्या मुलाला कुणाचे नाव द्यायचे, हा प्रश्न असतानाच वर्ध्यातील समाजसेविका मंगेशी मून यांनी पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतल्याने मोठा आधार मिळाला आहे.पण, आई-वडिलांना अंधारात ठेवून शिक्षित मुला-मुलींनी अशी पावले उचलणे कितपत योग्य, हाही विचार करण्याची गरज आहे.या मुलाचा बाप कोण?मुलीने केलेली चूक आणि तिचा झालेला विश्वाघात यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसला. कशीबशी ती मुंबईतून देवळी पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी विचारले, आई-वडिलांनी विचारले इतकेच काय तर डॉक्टरांनीही विचारले की, या मुलाचा बाप कोण? पण, विश्वासघाती बापाचे नाव घेण्याचीही मानसिकता नव्हती. अखेर डॉक्टरांच्या आग्रहानंतर तिने घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मानसिक धक्क्यातून बाहेर आणण्यासोबतच पुढील उपचार सुरू केले.

‘प्रहार’ने केला उपचाराचा खर्चआई-वडिलांचीही परिस्थिती बेताचीच. त्यांनी सेवाग्राम येथे उपचाराकरिता तिला सेवाग्रामला दाखल केल्यानंतर त्यांची ओळख समाजसेविका मंगेशी मून यांच्याशी झाली. वडिलांनी घडलेला प्रकार त्यांच्यापुढे कथन केला. त्यांना धीर देत बाळ आणि आईच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेऊन त्याला नाव देण्याचा विश्वास दिला. इतकेच नव्हे, तर नियमानुसार एक करारनामाही करून दिला. तसेच मून यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष विकास दांडगे व आदित्य कोकडवार यांची ओळख करून दिली. त्यांनी रुग्णालयातील पहिल्या दिवसांपासून तर प्रसूतीकाळापर्यंतचा सर्व खर्च स्वीकारून सामाजिक बांधिलकी जोपासली.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया