शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

रथोत्सवाला १५२ वर्षांची परंपरा

By admin | Updated: October 24, 2015 02:06 IST

येथील सुमारे १५२ वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रा महोत्सव रविवार (दि.२५) रोजी साजरा होत आहे.

बालाजी रथ यात्रा : जय्यत तयारी, भाविकांची गर्दीवायगाव (निपाणी): येथील सुमारे १५२ वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रा महोत्सव रविवार (दि.२५) रोजी साजरा होत आहे. या यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून भाविकांची गर्दी वाढत आहे. वाढती लोकसंख्या व गावाचा झालेला विकास यामुळे रथ गावातून फिरविणे कठीण जात असल्याने एकादशीच्या दिवशी गावातून लहान रथ फिरविण्यात येतो. या लहान रथाद्वारे शुक्रवारी गावातून प्रभातफेरी काढण्यात येते. यानंतर त्रयोदशीला मोठ्या रथात श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करून तो रथ गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येतो. या रथयात्रेत भजन, दिंडी, लेझीम, टिपऱ्या व ‘हरि नारायण गोविंदा’च्या जयघोषाने वायगाव नगरी दुमदुमून जाते. हा रथ लोकांद्वारे ओढल्या जातो. या उत्सवाकरिता ट्रस्टचे अध्यक्ष सुनील तळवेकर, सल्लागार चंद्रकांत ठक्कर, यांच्यासह सदस्य व गावकरी कार्यरत आहेत. बालाजी भगवान हे वायगावसह जिल्ह्यातील श्रद्धास्थान झाले आहे.रथोत्सवाची ऐतिहासिक पार्श्वभूमीवायगाव येथील पूजाजी महाराज आंध्र प्रदेशातील गिरी येथे बालाजीच्या दर्शनासाठी पायदळ वारी करीत होते.पूजाजी महाराज गिरी येथील नदीत स्थानकरिता गेले असता त्यांच्या हातात एक डबा आला तो डबा त्यांनी बाहेर आणून गिरी येथील बालाजी भगवान मंदिरात ठेवला आणि पूजा केली. नंतर तो डबा पूजाजी महाराजांनी वायगावाला आणला आणि खाली जागेवर ठेवून वरून तुराट्याचे मंडप बांधले त्या डब्याची लोक पूजा करू लागले. भजन पूजन आरतीला सुरुवात झाली. याठिकाणी स्वच्छ मनाने कामना केली जी पूर्ण होत अगेल्या याला सुरुवात १८६३ मधील असल्याने ज्येष्ठ नगारिक सांगत आहेत. तीन रात्रीत उभारल्या गेले दगडात मंदिरएका रात्री येथे चिरेदार दगडाचे मंदिर बनू लागले. मंदिर कोणी बनविले हे मात्र अजूनही माहीत झाले नाही. १८६४ पासून या मंदिरात भाविकांची गर्दी थोडी थोडी वाढू लागली होती. यामुळे गावातील वाघ नामक सुताराने रथाची निर्मिती केली. त्याच रथात आजही रथोत्सव होत आहे.पूजाजी महाराजांनी आणलेला डबा जागृत होता. त्याला जर कोणाचा स्पर्श झाला तर त्यातून रक्त बाहेर येत असल्याची आख्यायिका गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. या मंदिरात श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांची मोठी मूर्ती स्थापन करण्यात आली.