शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

बोरधरण परिसरात दुर्मीळ निळ्या टोपाचा कस्तूर

By admin | Updated: April 15, 2016 02:36 IST

जिल्ह्यातील बोरधरण परिसरात पहिल्यांदाच दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी आढळला. वर्धेतील पक्षी निरीक्षक राहुल वकारे यांनी त्याची नोंद केली आहे.

वर्धेतील पक्षी वैभवात भर : बहारच्या पक्षी निरीक्षकाची नोंदवर्धा : जिल्ह्यातील बोरधरण परिसरात पहिल्यांदाच दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी आढळला. वर्धेतील पक्षी निरीक्षक राहुल वकारे यांनी त्याची नोंद केली आहे. हा पक्षी उन्हाळ्यामध्ये हिमालयात व हिवाळ्यामध्ये मुख्यत: भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्या शेजारी उभ्या असलेल्या डोंगरांच्या रांगात स्थलांतर करतो. पानगळीची आर्द्र जंगले, सदाहरीत मध्यम आकाराची जंगले, कॉफिच्या लागवडीची क्षेत्रे आणि दाट बांबूच्या जंगलात राहणारा हा पक्षी हिवाळ्यात जवळजवळ संपूर्ण भारतात तर उन्हाळ्यात काश्मीर, हिमालयात १००० ते ३००० मीटर उंचीपर्यंतच्या क्षेत्रात, अरुणाचल प्रदेश, नागालॅँड व मेघालय या ठिकाणी आढळतो. बोरमध्ये पारा ४० डिग्री वर पोहचला असल्यानंतरही हा पक्षी या उष्ण भागात कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. निळ्या टोपीचा कस्तूर असे त्याचे मराठीत असून निळ्या डोक्याचा कस्तूर या नावाने सुध्दा ओळखले जाते. इंग्रजीमध्ये त्याला ब्ल्यु कॅप्ड रॉक थ्रश किंवा ब्ल्यु हेडेड रॉक थ्रश या नावाने संबोधले जाते. हिंदीमध्ये याला नीलसिर कस्तूरी म्हटल्या जाते. जलकाद्य या कुळातील पक्षी असून याचे शास्त्रीय नाव मोनटींकोला सिक्लोरींकह्स असे आहे. निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी साधारण १७ से.मी. आकाराचा असतो. यातील नर पाठीकडून गडद निळा आणि काळा, डोके व कंठ निळा, पोटाकडून तांबुस- पिंगट असा असतो. नराच्या पंखांवर पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसून येतो. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा तलाव परिसरात २०१४ मध्ये मार्च व मे महिन्यात या पक्षाची नोंद झाली होती. या पक्षाचे छायाचित्र न मिळाल्यामुळे यवतमाळच्या पक्षी सुचीत अधिकृत नोंद करता आली नाही नव्हती. अमरावती जिल्ह्यात या पक्षाची नोंद असल्याची माहिती अमरावतीचे पक्षी व वन्यजीव अभ्यासक डॉ. जयंत वडतकर यांनी दिला. तसेच हा पक्षी भटक्या असून क्वचितच आढळतो, अशी माहिती दिली. बोरधरणाच्या परिसरात बहार नेचर फाऊंडेशनचे सदस्य राहुल वकारे, पवन दरणे व सारांश फत्तेपुरीया पक्षी निरीक्षणासाठी २२ मार्च रोजी गेले होते. तेथील सागाच्या पानगळी भागात दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी राहुल वकरे यांना आढळला असता त्यांनी तो कॅमेराबद्ध केला.(प्रतिनिधी)लेप्रेसी फाउंडेशन ठरते पक्ष्यांचे नंदनवन वर्धा- शहरातील महात्मा गांधी लेप्रेसी फाउंडेशनचा परिसर हा जैवविविधीतेने नटलेला एक समृद्ध अधिवास आहे. या परिसरात पक्षीअभ्यासकाने तीन नव्या पक्षांची नोंद घेतलेली आहे. यात वृक्ष चरचरी, लाल छातीची लिटकूरी व सिकीसचा वटवट्या या पक्षांचा त्यात समावेश आहे.वृक्ष चरचरी या पक्षाला इंग्रजीत ट्री पिपिट असे म्हणतात. साधारणत: चिमणीच्या आकारा एवढा हा पक्षी हिरवट तपकिरी रंगाचा व त्यावर गर्द तपकिरी रेषा असतात. हे पक्षी आपल्याकडे हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. लाल लिटकूरी या पक्षाला लाल छातीची माशिमार असेही म्हणतात, तर इंग्रजीत रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर म्हणतात. आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेल्या या पक्षाचा कंठ व छाती नारंगी रंगाची असते. हा पक्षी महाराष्ट्रासह दक्षिणेकडील कर्नाटक या भागातील हिवाळी पाहुणा होय. या नोंदीतील तिसरी नोंद सिकीसचा वटवटया असून इंग्रजीत सिकीस वार्बलर असे म्हणतात. आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला हा पक्षी वरुन फिक्कट करड्या व खालून भूरकट रंगाचा असून चोच किंचीत लांब असते. याची विण वायव्य भारतासह पाकिस्तानात होते. हे पक्षी देखील आपल्याकडील हिवाळी पाहुणे होय.