वर्धा : येथील एका गजबजलेल्या वस्तीत फुले तोडायला गेलेल्या एका १६ वर्षीय युवतीला पळवून तिच्यावर दोन युवकांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली. यानंतर पुन्हा एका १४ वर्षीय मुलीवर दोन युवकांनी बलात्कार केल्याची घटना रात्री उशिरा सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेत चार जणांना ताब्यात घेतले ुआहे. सेवाग्राम येथील प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बलात्कारप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना आर्वी नाका परिसरातून अटक केली. शिक्षणासाठी वर्धेत येऊन भाड्याने राहात असलेली एक युवती स्थानिक गांधीनगर येथे पहाटे फुले तोडण्यासाठी गेली होती. अंधाराचा फायदा घेत दोन अज्ञात युवक तिच्याजवळ आले. यानंतर त्यांनी तिचे तोंड दाबून हातपाय बांधले. तिला परिसरातील खुल्या जागेवर नेऊन तिच्यावर आळीपाळीने दोघांनीही बलात्कार केला. दोघांनाही तिला तिथेच सोडून पोबारा केला. यानंतर ती पीडिता राहत असलेल्या घरी गेली. घडलेला प्रसंग घरमालकाला सांगितला. त्यांनी तिच्यासह शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. आरोपींचे वर्णन सदर युवतीने पोलिसांना सांगितले आहे. दोघेही २३ ते २४ वयोगटातील असल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. दुसरी घटना सेवाग्राम ठाण्याच्या हद्दीतील आहे. गुरुवारी एका १७ वर्षीय मुलीला दोन तरुणांनी धमकी देत तिला दुचाकी आपल्या दुचाकीच्या मागे यायला सांगितले. यानंतर त्या दोघांनी तिला पवनार येथील कॅनलवर नेले. तिथे दोघांनाही आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी पवन डहाके (२३) रा. सेवाग्राम व आदित्य तामगाडगे (२३) रा. नांदोरा या दोघांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.(स्थानिक प्रतिनिधी)
वर्धेत दोन अल्पवयीन युवतींवर बलात्कार
By admin | Updated: September 27, 2014 02:05 IST