शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कराराच्या मागणीसाठी रापमचे कामगार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:25 IST

रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती.

ठळक मुद्देवाहतूक सेवा खोळंबली : लाखोंचा आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रा.प.म.च्या कामगारांनी वेतन कराराच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात मोठ्या संख्येने वाहक व चालक सहभागी झाल्याने रापमच्यावतीने देण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा शुक्रवारी सकाळी खोळंबली होती. या संपात सर्वच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले नसले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे रापमच्या वर्धा विभागातील पाचही आगारातून अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी, रापमला लाखांचा आर्थिक फटकाच बसला.रापमच्या वर्धा विभागाच्या अंतर्गत पाच आगार आहेत. या पाचही आगारातून दररोज ३५९ बस फेºयांचे नियोजन केले जाते. रापमच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या होत्या. जसजसा सूर्य मावळतीला गेला तसतशा बस फेऱ्याही रद्द होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे रापमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रापमच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप जाहीर होताच मध्यरात्री वर्धा आगारात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.या आगारात एकूण ७९ बसेस असून त्यापैकी रात्रपाळीला ३० बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर १४ बसेस परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सदर बेमुदत संपात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण कार्यकर्ते तसेच एमएमकेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपात सहभागी रापमच्या वाहक, चालक व कर्मचाºयांनी वर्धा आगारासमोर दिवसभर ठिय्या देत सरकार विरोधी निदर्शने केली.अन् पोलीस बंदोबस्तात आगारातून बाहेर पडल्या बसेसफेºयांचे नियोजन केल्यानंतर जे रापमचे चालक व वाहक संपात सहभागी नाही त्यांच्याकडून आगारात उभी असलेली बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संपात सहभागी वाहक, चालक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आगाराच्या मुख्य द्वारावर अडविल्याने काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या शांततापूर्ण तणावाच्या वातावरणात अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून आगारात उभ्या असलेल्या बसेस आगाराबाहेर काढल्या.कामगारांसह कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ७६ बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अल्प मनुष्यबळामुळे बस फेऱ्या रद्द झाल्याने रापमच्या वर्धा विभागाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान लाखोंच्या घरात आहे.- चेतन हासबनीस, विभाग नियंत्रक, रा.प.म. वर्धा.

टॅग्स :ST Strikeएसटी संप