शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या नावावर तहसील कार्यालय रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:02 IST

येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांना हेलपाटे : कार्यालयाची सुरक्षाही वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना शिधा पत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदीची गरज असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यालयात येतात. विशेषत: २५ पायऱ्या चढून या कार्यालयात जावे लागत असल्याने याचा वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे. त्यातही कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घ्यावे लागत आहे. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात राहत असून त्यांना विचारणा केल्यावर तेही उडवाउडवीचे उत्तर देत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगतात. काही कर्मचारी तर आलेल्यांना दमदाटी करीत कुणाला तक्रार करायची असेल त्यांच्याकडे तक्रार करा, असा उपराटा सल्लाही देत असल्याने नागरिकांचा पारा चढत आहे.शुक्रवारी आमगाव (खडकी) येथील वृद्ध नागरिक नामदेव रामाजी नेहारे हे सकाळी ११ वाजता स्टॅम्प अपेडेव्हीट करण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी तहसील कार्यालयातील सर्व टेबलवर चौकशी केली पण कुणीही माहिती दिली नाही. कामाच्या प्रतीक्षेत इतक्या उन्हाच्या तीव्रतेत दुपारी अडीच वाजतापर्यंत ताटकाळत राहीले. परंतू एकही अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाला नाही. हाच अनुभव इतरही नागरिकांना आला.तहसील कार्यालय सकाळी १० वाजता उघडले असले तरी १०.३० वाजतापर्यंत एकही कर्मचारी या कार्यालयात उपस्थित नव्हता.त्यामुळे कार्यालयातील वस्तू व दस्तऐवजाची सुरुक्षा वाºयावरच असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगितले जात होते तर आता लोकसभा निवडणुकीचे कारण दिले जात असल्याने नागरिकांनी किती दिवस प्रतीक्षा करावी, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे....तर कार्यालय कुलूप बंद ठेवावेकार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना सध्या निवडणुकीच्या कामांचा व्यस्त असल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागत असल्याने कारण देण्यापेक्षा कार्यालयच कुलूप बंद करुन ठेवा, असा संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :TahasildarतहसीलदारElectionनिवडणूक