शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कारंजाचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर केंद्र रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:47 IST

येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर केंद्रातील कामकाज सध्या वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे रामभरोसेच सुरू आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाºयांची नऊ पदे; पण कार्यरत केवळ दोनच

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर केंद्रातील कामकाज सध्या वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे रामभरोसेच सुरू आहे. येथे वैद्यकीय अधिकाºयांची नऊ पदे मंजूर असून केवळ दोन वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवश्यावर नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. कामकाज करताना कार्यरत दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांना तारेवरची कसरतच करावी लागत असल्याने रिक्त पदे तात्काळ भरण्याची गरज आहे.परिसरातील प्रत्येक घरी ताप, सर्दी, खोकला आदी विविध आजारांची लागण झालेले रुग्ण असल्याचे दिसून येते. विविध आजारांनी सध्या या परिसरात थैमानच घातले आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचेही आजार बळावत आहेत. दररोज या रुग्णालयात सुमारे ४०० रुग्ण येत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आरोग्य सेवा घेण्यासाठी येत येत असताना रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावे या हेतूने येथे ट्रामा केअर केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात येणाºया रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवितांना वैद्यकीय सचिन खोंड व अधीक्षक डॉ. प्रभाकर वंजारी यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आठवड्याची सुटी न घेता ते बहुदा सलग चार-चार दिवस कर्तव्य बजावतात. दोन वैद्यकीय अधिकाºयांवर येणारा कामाचा वाढता तान लक्षात घेता सदर रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.कारंजा ग्रामीण रुग्णालयासाठी तीन वैद्यकीय अधिकारी व एक अधीक्षक तसेच ट्रामा केअर युनीटसाठी दोन वैद्यकीय अधिकारी, दोन भुलतज्ञ, एक अस्थिभंग तज्ञ आणि एक जनरल फीजीशीयन अशी एकूण नऊ पदे मंजूर आहेत. परंतु, सद्या स्थितीत ट्रामा केअर युनीटला एकही डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येथील दोन्ही रुग्णालये मिळून चक्क सात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. १५ वर्षापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयाला लागून असलेले ट्रामा केअर युनीट सुरू करण्यात आले आहे. यासाठी करोडो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला आहे. लाखोंच्या मशीनरी आणल्यात. पण, तज्ज्ञच उपलब्ध नाही. परिणामी, मशीनरी धुळ खात पडल्या आहेत. एक्सरे टेक्नीशीयन आहे; पण त्याला काम नाही. ११ परिचारीका, चार स्वच्छता कर्मचारी असले तरी स्वच्छतेचा वानवा आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता सदर प्रकरणी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.देयक न दिल्याने इमारतीचे बांधकाम अपूर्णचग्रामीण रुग्णालयांची जुनी इमारा शिकस्त झाल्यामुळे ३ कोटी ७० लाख रूपये खर्च करून नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कंत्राटदाराला बांधकामाची देयके प्राप्त झाली नसल्याने काम अपूर्ण आहे. बांधकामाची मुदत संपली आहे. बांधकाम पूर्ण होवून ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीमध्ये केव्हा जाणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. एकदंरीत ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर केंद्राच्या सध्याच्या कामाकाजाकडे संबंधीत वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्षच होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये आहे.अनेक दिवसांपासून शासनाकडून नवीन वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली नाही. आम्ही दोघे सलग दोन-दोन दिवस ड्युटी करून नागरिकांना आरोग्य सेवा पुरवितो. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे.- डॉ. प्रभाकर वंजारी, अधीक्षक, ग्रा.रु. कारंजा (घा.)