शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२००५ नंतरच्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:17 IST

पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पर्यावरण संवर्धन संस्था मागील गत चार वर्षांपासून घरोघरी रेन वाटर हार्वेस्टिंग व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी वॉर्डात सभा घेणे, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, पत्रक, जल साक्षरता रॅली या माध्यमातून शहरात जनजागृती व प्रत्यक्ष कार्य करीत आहे.या विषयावर मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते यांच्याशी पर्यावरण संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून जल भरण उपक्रमाविषयी माहिती घेतली. गत तीन वर्षांपासून संस्था या विषयाचा पाठपुरावा करीत आली आहे. प्रत्यक्ष स्वरूपात कामही केले आहे. त्याच अनुषंगाने मागच्या दोन बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली होती. त्यावेळी २००५ नंतरच्या घर बांधकामांची यादी मागवली होती. त्यासंबंधी चर्चा झाली. ज्यामधे एकूण २,६३३ अशी घर आहेत ज्याचे बांधकाम २००५ नंतरचे आहे, अशी माहिती नगर पालिकेनी दिली. या संपूर्ण घरी रोन वॉटर हार्वेस्टिंग व चार झाड लावण्याचे काम लवकरात लवकर करावे अशा नोटीस घरामालकाला पाठवण्यात येणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग व वृक्षरोपण बंधनकारक करणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.शहरातील खुल्या जागांवर जलभरण व्हावे अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. यासाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. जमिनीत पाणी जिरवने हे काम अत्यावश्यक आहे व याचा शहराला फायदा होईल असेही मुख्याधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी संस्थेचे आशिष भोयर, प्रदीप गिरडे, अभिजित डाखोरे, छत्रपती भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, हेमंत हिवरकर उपस्थित होते.