शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

वर्ध्यातले पर्जन्यमान केंद्र दहा वर्षांपासून आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 14:26 IST

शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात पर्जन्यमानाचे मोजमाप नाही एक खराब झाल्यावर दुसरेही बसविले

अमोल सोटे।आॅनलाईन लोकमतवर्धा : शासनाने तालुकास्थळी पावसाळ्यातील पाण्याची सरासरी मोजण्यासाठी पर्जन्यमान केंद्र निर्माण केले; पण याची देखभाल, दुरूस्ती करणारी यंत्रणाच नाही. यामुळे दहा वर्षापासून हे केंद्र आजारी अवस्थेत आहे. परिणामी, शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. यासाठी त्वरित यंत्रणा उभी करून पर्जन्यमान केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.दहा वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात पर्जन्यमान केंद्र निर्माण करण्यात आले होते. यासाठी पर्यायी अधिकारीही देण्यात आले होते. दोन वर्षे येथे अचूक आकडेवारी मिळत होती. यानंतर मात्र यातील यंत्र कुलूपबंदच असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे देखभाल व दुरूस्ती करण्यात आली नसल्याने सदर केंद्र बंद पडले आहे. केंद्राच्या सभोवताल तयार केलेल्या कुंपणाला लोखंडी गेट लावले होते. त्याला असलेले बंद कुलूप पूर्णपणे जंगलेले आहे; पण त्याची दुरूस्ती व पाहणी कोणत्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत केली नाही. शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका येथे बसत आहे.यानंतर दुसरे पर्जन्यमान केंद्र त्याच्या शेजारीच उभारण्यात आले. त्याच्यासमोर असलेल्या फलकावर महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र महाराष्ट्र शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा.लि. यांचा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प, अशा पद्धतीचा मजकूर लिहिलेला आहे. याही गेटच्या कुलूपाला दोन वर्षांपासून जंग चढला आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. शेतकºयांना वेधशाळेची अचुक माहिती मिळाल्यास पाऊस कधी येणार, किती होणार या सर्व बाबींवर पीक परिस्थिती अवलंबून असते. यामुळे लाखो रुपये खर्च करून त्याचे फलित मिळणार नसेल तर उपयोग काय, हा प्रश्नच आहे. शासनाने हवामान व पर्जन्यमान केंद्राचे धोरण स्पष्ट केले. दोन्ही केंद्र एकाच ठिकाणी असल्याने तालुकानिहाय पावसाची आकडेवारी तंतोतंत मिळण्यास मोलाची मदत होते.दुसऱ्या केंद्राचेही दोन वर्षांपासून कुलूप बंदचतहसील कार्यालय परिसरात दहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेले पर्जन्यमापक केंद्र बंद आहे. यामुळे त्यातील यंत्रही खराब झाले. परिणामी, दोन वर्षांपूर्वी दुसरी यंत्रणा उभारण्यात आली; पण दोन वर्षांपासून त्या यंत्रणेचेही कुलूप उघडण्यात आलेले नाही. यामुळे गेटवरील कुलूप गंजले असून पावसाचे मोजमापच घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनाही अचुक पावसाचा अंदाज कळत नाही. परिणामी, पिकांचे नियोजन करता येत नाही. ही यंत्रणा सुधारण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.पाहणीही नाहीदहा वर्षांपासून बंद असलेल्या पर्जन्यमान केंद्राची साधी पाहणी करण्याचे सौजन्यही अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. यामुळे खर्च व्यर्थ गेल्याचेच दिसून येत आहे.