शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘सोयाबीन’साठी पाऊस ठरतोय ‘खलनायक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:16 IST

यंदाच्या वर्षी सुरूवातील पावसाने दडी मारली. तर नंतर दोन महीने थांबून थांबून मुसळधार पाऊस पडला. तशी नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व खत देण्याच्या कामासह औषधी फवारणीचे काम करता आले नाही. शिवाय परिसरातील अनेक शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले होते.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने लावली हजेरी : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शेतकऱ्यांचे दिवाळी बोनस म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीन पिकांसाठी सध्या परतीचा पाऊस खलनायक ठरत असल्याचे चित्र चिकणी परिसरात बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, रविवारी सकाळी या भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातील पावसाने दडी मारली. तर नंतर दोन महीने थांबून थांबून मुसळधार पाऊस पडला. तशी नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व खत देण्याच्या कामासह औषधी फवारणीचे काम करता आले नाही. शिवाय परिसरातील अनेक शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले होते. सततच्या पावसाचा फटकाच उभ्या सोयाबीन पिकावर दिसून आला. तर अजूनही काही शेतांमधील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. या भागातील सोयाबीन उत्पादकांनी जीवाचे रान करून पिकाची निगा घेतल्याने पीक बहरले.सध्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनीही सोयाबीनची कापणी केली. तर काहींनी सोयाबीनची कापणी करून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीनची मळणी केली. काही शेतकऱ्यांना एकरी ७ ते ८ तर काहींना ४ ते ५ पोती सोयाबीनचा उतारा आल्याचे शेतकरी सांगतात. असे असले तरी अजूनही अनेकांच्या शेतात कापलेले सोयाबीन पडून आले. अशातच रविवारी सकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.यंदा पाऊस सोयाबीन पिकासाठी खलनायक ठरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. शिवाय सोयाबीनच्या उत्पन्नातही बºयापैकी घट येत असल्याचे या भागातील शेतकरी सांगतात.सोयाबीन शेतातून थेट मार्केटमध्येज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची कापणी करीत मळणी केली, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पदरी आलेले सोयाबीनचे उत्पादन थेट बाजारपेठेत विक्रीकरिता नेले. सध्या सोयाबीनला ३ हजार ते ३ हजार ३०० पर्यंत भाव मिळत आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण न करता थेट विक्रीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती