रेल्वेच्या गोदामाला आग... वर्धा येथील मुख्य रेल्वे स्थानकावरील गोदामाला सोमवारी रात्री अचानक आग लागली. यात गोदामातील साहित्याचा कोळसा झाला. येथे रेल्वेचे निरुपयोगी साहित्य असल्याचे रेल्वेच्या पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सकाळीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. ही आग नेमकी कशाने लागली व यात रेल्वेचे किती रुपयांचे नुकसान झाले याचा खुलासा मात्र झाला नाही.
रेल्वेच्या गोदामाला आग...
By admin | Updated: January 6, 2016 02:31 IST