शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अफवेच्या बाजारात ग्राहकांची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:56 IST

पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली.

ठळक मुद्देम्हणे, ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल बंदी : भीतीपोटी बोअरवेल करण्यासाठी नागरिकांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी वाढीव दर चुकवत बोअरवेल करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. सध्या या अफवेमुळे ग्राहकांची चांगलीच लूट सुरुअसून ही अफवा कुणी पसरविली व का? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.जिल्ह्यातील पाणीबाणी तीव्र होतांना दिसून येत असल्याचा फायदा आता काही मंडळी घेताना दिसून येत आहे. सध्या जलाशयात केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही अवस्था असताना भविष्यात नागरिकांना आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नागरिकांनी बोअरवेल करण्याचा पर्याय निवडला आहे. बोअरवेलला मागणी वाढत असताना पाहून ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी हातचे काम सोडून मशीन मिळविण्यासाठी बोअरवेल व्यावसायीक व एजंटकडे धाव घेतली आहे.सध्या तर बोअरवेलचे भावही वीस ते तीस रुपयाने वाढविण्यात आले आहे. नागरिकांची गरज लक्षात घेत अफवेचा दाखला देऊन आणखी जास्त पैसे कसे उकळता येईल, याचाच प्रयत्न काहींकडून सुरु आहे. परंतु संबधित विभागाकडे बोअरवेल करण्याच्या बंदीबाबत विचारणा केली असता कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आल्याने ही केवळ अफवाच असल्याने उघडकीस आले आहे.एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांना मानुसकीच्या नात्याने सहकार्य करण्याऐवजी दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलून आपले खिसे भरण्याचा लाजिरवाणा प्रकार काहींनी चालविल्याने दिसून येत आहे. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ही लुटमार थांबवित यावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरतांना दिसून येत आहे.बोअरवेल व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूटशहरात सध्या बोअरवेल दर वाढले आहे. कमी दरात दुसरा बोरवेल व्यावसायिक बोरवेल करायला तयार असल्यास वर्ध्यातील बोअरवेल व्यवसायिक असोसिएशन त्याला वर्ध्यात काम करु देत नाही.अशा प्रकारे शहरातील नागरिक व शेतकऱ्यांची बोअरवेल व्यावसायिकांनी लुट चालविली आहे. असा आरोप किसान सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू हिंगमोरे यांनी केला आहे. डिझलचे भाव कायम असतानाही बोअरवेलचे दर वाढविण्यात आल्याने यावर लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याबाबत कुठलाही आदेश किंवा पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. तसे असते तर कार्यालयाकडून संबंधितांना आधीच सूचना दिल्या असत्या, असे भूजल सर्वेक्षण अधिकारी भुसारी यांनी सांगितले.वर्ध्यात आठ व्यवसायिक आहेत. एका दिवशी दोन बोरवेल केले जात आहे. सध्या डिझलचे भाव वाढल्याने आणि कामागांची मजूरी वाढल्याने बोरवेलचे दर वाढवावे लागले, असे बोअरवेल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जावंधिया यांनी सांगितले.बोरवेलनंतर आता जलपुनर्भरणाची गरजजगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून गरजेनुसार सर्वच नागरिक भूगर्भ पोखरायला लागले आहे. पाचशे मीटरच्या परिसरात दुसरे बोअरवेल करता येणार नाही, असे नियम असतानाही याला छेद दिला जात आहे. तसेच दीडशेपेक्षाही जास्त फुट खोलपर्यंत बोअरवेल केली जात आहे. यामुळे भविष्यात भूगर्भातील पाणीही नाहिसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन प्रत्येकाने घरी व कार्यालयात जलपुनर्भरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई