शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुंजखेडा वाळू घाटावर धाड, पाच तराफे केलेत नष्ट, जिल्हास्तरीय आकस्मिक पथकाची कारवाई

By आनंद इंगोले | Updated: March 2, 2023 17:29 IST

देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक

वर्धा :

देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक तपासणी पथकाने धाड टाकली. यावेळी पाच तराफांच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व तराफे जप्त करुन ते नष्ट करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारपासून गुरुवारी सकाळपर्यंत चालली.

वर्धा नदीपात्रावरील गुंजखेडा येथील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळू उपासा चालतो. यापूर्वीही अनेकदा येथे कारवाई झाल्यानंतरही वाळू चोरट्यांचे ह्य पुन्हा येरे माझ्या मागल्या ह्ण असेच सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हा स्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी आपल्या चमूसह बुधवारी दुपारी साडेचार वाजता गुजखेडा वाळू घाट गाठला. यावेळी घाटामध्ये आठ मजुर पाण्यातील वाळू अवैधरीत्या तराफ्याच्या साहाय्याने बाहेर काढत असल्याचे निदर्शनास आले. आणखी घाटामध्ये पाहणी केली असता पाचवा ही तराफा दिसून आला. हे पाचही तराफे जप्त करुन ते नष्ट करण्याचे काम दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरुच होते. एका तराफ्याची किंमत ४० हजार रुपये असून एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केला. या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.पोलिस म्हणतात 'ऑल ईज वेल'पुलगाव पोलिस विविध कारणांमुळे चांगलेच वादात सापडत आहे. या पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या गुंजखेडा वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरु होता. परंतु तरीही पुलगाव पोलिसांकडून सर्व काही  'ऑल ईज वेल' असल्याचे वरिष्ठांना सांगितले जात होते. परंतु या वाळू चोरीच्या माध्यमातून कुणाचे 'ऑल ईज वेल' होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खनिकर्म अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून गाठला घाटपोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने वाळू चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता वाळू चोरटेही सजग झाले आहे. अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जात आहे. कोणत्या अधिकाऱ्यांचे वाहन कोण्या दिशेने जातात, यावर लक्ष ठेवण्याकरिता खबऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईवर ही परिणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी चक्क दुचाकीवरून गुंजखेडा येथील वाळू घाट गाठत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, तुषार शिंदे, तलाठी भारत डेहनकर, अजय नागे व मनोहर हांडे यांचा समावेश होता. जिल्ह्यात कुणीही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आला.