शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गुुंजखेडा घाटावर छापा, दोन बोटी फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात आल्याची वारंवार ओरड होत आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाची कारवाई : दहा ट्रॅक्टर वाळूसाठा केला जप्त, तेरा बोटी पळाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नजीकच्या गुंजखेडा वाळू घाटावर अवैधरित्या बोटीच्या (तराफे) सहाय्याने वाळू उपसा सुरु होता. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता १३ बोटी पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यामुळे हाती लागलेल्या दोन बोटी फोडून जवळपास १० ट्रॅक्टर वाळू साठा जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत चालली.वाळू घाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही गुंजखेडा येथी वर्धा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध उपसा सुरु आहे. या नदीपात्रालगत जलशुद्धीकरण केंद्र आहे तसेच नाचणगाव व पुलगावचे पंपहाऊसही आहेत. येथील अवैध वाळू उपस्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात आल्याची वारंवार ओरड होत आहे.अशातच बुधवारी वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळताच तलाठी तामगाडगे यांनी वाळू घाटावर छापा टाकला असता नदीपात्रात पंधरा बोटी दिसून आल्या. पथक दिसताच १३ बोटी पळून गेल्या तर दोन बोटी हाती लागल्याने कुऱ्हाडीच्या सहाय्याने त्या फोडून टाकल्या. याची माहिती तलाठ्यांनी तहसीलदार राजेश सरवदे यांना दिल्यानंतर त्यांनी लागलीच जेसीबीसह पोलीस पाठविले. त्यांनी वाळू घाटांवरुन दहा ट्रॅक्टर वाळूसाठा जप्त केला. आता हा वाळूसाठा कोणाचा याची माहिती प्रशासन घेणार का? असा प्रश्न आहे.तलाठ्याची धाडसी कारवाईपावसामुळे नदी तुडूंब भरली असून त्यामध्ये बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून येताच तलाठी मनोज तामगाडगे यांनी नदीपात्रात पोहोत जाऊन दोन बोटी पकडल्या. मात्र, तेरा बोटी त्यांच्या हातून निसटल्या. यापूर्वीच्या कारवाईतही त्यांनी नदी पात्रात उडी घेऊन एक बोट हस्तगत केली होती. त्याच्या या धाडसी कारवाईची सध्या चर्चा आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsandवाळू