शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

कण वाळूचे रगडिता पैसाच मिळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:50 PM

लिलावच होत नसल्याने पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राला वाळूमाफिया, चोरांनी टार्गेट केले आहे. या पात्रातून दररोज बेसुमार वाळूउपसा सुरू असतो. उपसा केलेल्या वाळूची गुंजखेडा आणि पुलगाव येथे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत असल्याने घरोघरी वाळूचा गृहोद्योग थाटण्यात आल्याचेच निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देगुंजखेड्यात घरोघरी वाळूचे गृहोद्योग : वाळूमाफियांचा कोटींच्या संपत्तीवर डोळा

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लिलावच होत नसल्याने पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथील वर्धा नदीपात्राला वाळूमाफिया, चोरांनी टार्गेट केले आहे. या पात्रातून दररोज बेसुमार वाळूउपसा सुरू असतो. उपसा केलेल्या वाळूची गुंजखेडा आणि पुलगाव येथे मोठ्या प्रमाणावर साठेबाजी होत असल्याने घरोघरी वाळूचा गृहोद्योग थाटण्यात आल्याचेच निदर्शनास आले आहे. गुंजखेडा-पुलगाव फार कमी अंतर आहे. केवळ रस्ता ओलांडून शहरातील वाळूमाफिया, वाळूचोरांना पल्याड म्हणजे वाळूघाटात शिरता येते. यंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने संपूर्ण पात्र खुले आहे. यामुळे चांगलेच फावत असून नदीपात्रात पुलगाव, देवळी इतकेच नव्हे, तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील वाळूमाफियांनी धुडगूस घातल्याची स्थिती आहे.गुंजखेडा आणि पुलगावातील काही भागात फेरफटका मारला असता कित्येक घरी चोरीच्या वाळूचे मोठ्या प्रमाणावर ठिय्ये आढळून येतात. नजर जाईल तिकडे वाळूच दिसते. माफियांकडून दररोज किमान ४० ते ५० ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरून नेली जात आहे. एकट्या गुंजखेड्यात २ हजार ब्रासवर वाळूसाठा साठविण्यात आला असल्याने गृहोउद्योग थाटले की की काय, असा प्रश्न पडतो. हा चोरटा व्यवसाय ‘सावर’ण्याकरिता काही अधिकाऱ्यांचेही ‘कर’ जुळत आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या वाळूउपस्यामुळे पात्रात डोह तयार झाले असून धोकादायक वळणावर आहे. दुसरीकडे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो आहे, तर स्थानिक प्रशासनाकरिता हा घाट सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरला आहे.नदीपात्रात ६ कोटींची वाळूसंपत्तीजिल्ह्यातील पुलगावपासून अवघ्या पाच-सात किलोमीटर अंतरावर असलेला गुंजखेडा वाळूघाट दीड ते दोन किलोमीटरचा असून यात ६ कोटींवर वाळूसंपत्ती आहे. या संपत्तीची चोरांकडून निरंतर लूट सुरू आहे.आठ वर्षांपासून घाट लिलावावर बंदीगुंजखेडा नदीपात्रात केंद्रीय दारूगोळा भांडाराचे पंपिंग स्टेशन आहे. यामुळे भांडार प्रशासनाकडून घाट लिलावास ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे आठ वर्षांपासून प्रशासनाकडून लिलाव केला जात नाही. याच संधीचे वाळूचोरांनी सोने केले आहे.नुकत्याच केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून संपूर्ण वाळूसाठा जिल्हास्थळी आणून त्याचा लिलाव करण्यात येईल. याशिवाय गुंजखेड्यात कारवाईचे सत्र सुरूच ठेवू.- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.कोटींची वाळू खाऊन माफिया मस्तवालगुंजखेडा घाटातील वाळूचा रात्री-बेरात्री अवैध वारेमाप उपसा करून पुलगावतीलच दोन ते तीन बड्या माफियांनी कोट्यवधींची माया जमविली आहे. प्रशासनाला विकत घेण्याची क्षमताच या व अन्य वाळूमाफियांनी निर्माण केली आहे. मागील आठ ते दहा वर्षांपासून गुंजखेडा घाटातून वाळूचोरीचा गोरखधंदा स्थानिक प्रशासनाच्या आशीवार्दाने सुरू असून माफियांसोबतच तहसीलचे अधिकारी, कर्मचारीदेखील गब्बर झाले आहेत. तसेच काही वाळूमाफियाच अधिकाºयांत मध्यस्ती करीत असल्याचे अनेक सबळ पुरावे ‘लोकमत’कडे उपलब्ध आहेत.

टॅग्स :sandवाळू