शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रा.काँ. नेते झाले महात्म्यापुढे नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:33 IST

शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे व जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रवादी काँगे्रसची हल्लाबोल पदयात्रा बुधवारी पोहोचली.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांनी जाणून घेतली आश्रमाची माहिती

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे व जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रवादी काँगे्रसची हल्लाबोल पदयात्रा बुधवारी पोहोचली. याप्रसंगी आश्रमद्वारे मार्गदर्शिका संगीता चव्हाण यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे सुतमाळ व सेवाग्राम आश्रमाचे पुस्तक देऊन स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांनी महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होत प्रार्थनेत सहभाग घेतला.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, गुलाबराव देवकर, ख्वाजा बेग, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, माजी आमदार गुलाबराव गावंडे, प्रा. सुरेश देशमुख, प्रा. राजू तिमांडे, प्रवक्ता विलास लवांडे, संदीप बाजोरिया, गणेश दुधगावकर, महेश तपासे, शंकर अण्णा धोंडगे, समीर देशमुख, सुनील राऊत यासह उपस्थितांनी आश्रमाची पाहणी करीत माहिती घेतली. यानंतर बापूकुटीसमोर बकुळीच्या झाडाखाली सर्वधर्म प्रार्थना, भजन झाले. आश्रमचे नामदेव ढोले, सिद्धेश्वर उमरकर, बाबा खैरकर, प्रशांत ताकसांडे, शंकर वाणी, सुधीर मडावी, सचिन हुडे, जानराव खैरकर, आकाश लोखंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रपाल गणविर, अनिल भोगे, पं.स. सदस्य भारती उगले, बघेल, देशमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुप्रिया सुळे ठरलेल्या वेळेत आश्रमात आल्या. सर्वांशी संवाद साधला. चौकशी व चर्चा केली. यातून त्यांचा दिलदारपणा दिसून आल्याची चर्चा होती.भेट पुस्तिकेत नोंदविला अभिप्रायआश्रम भेट पुस्तिकेतील खा. सुप्रिया सुळे यांनी अभिप्राय नोंदविला. यात ’हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आज सेवाग्राम येथील बापुकुटीमध्ये येणे झाले. सकाळच्या प्रार्थनेत सहभागी झाले. याचे खूप समाधान वाटते. येथील शांत व पवित्र वातावरणात खरोखरच मनाला एक प्रकारची शांती लाभते, याचा प्रत्यय आला. येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधता आला, याचाही मला आनंद आहे. महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’!