शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

केंद्रीय मंत्र्यांचे 'आश्वासन' फोल; पाच वर्षे लोटली तरी 'उड्डाणपूल' अपूर्णच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 14:16 IST

सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली.

ठळक मुद्देनोव्हेंबर २०१८ होती 'डेडलाईन' रेल्वे अन् सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव?

वर्धा : जिल्ह्यातील महत्त्वाकांशी प्रकल्पांपैकी एक अशी ओळख असलेल्या वर्धा शहरातील बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या (Vinoba Bhave flyover Wardha) रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेत ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. पण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहिल्याने हे काम पाच वर्षे लोटूनही अपूर्णच आहे.

विशेष म्हणजे मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी लोकसभेत खा. रामदास तडस(Ramdas Tadas) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, उड्डाणपुलाचे काम बंदच असल्याने त्यांचे आश्वासनही सध्या फोल ठरत आहे. परिणामी सदर विकासकाम पूर्णत्वास जावे यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत वज्रमूठ बांधून उड्डाणपुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी रेटण्याची गरज आहे. 

४५ कोटींचा निधी मंजूर

सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. शिवाय या विकासकामासाठी तब्बल ४५ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. पण सध्या हे विकासकाम रेंगाळले आहे.

अहमदनगर गाठून केली गडरची पाहणी

आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलासाठी लागणारे गडर अहमदनगर येथील आरएनडी कंपनीने तयार केले आहेत. याच गडरची पाहणी ३१ ऑक्टोबरला अहमदनगर गाठून सार्वजिनक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश माथुरकर, शाखा अभियंता मतीन नडगिरे यांनी केली आहे.

खर्चाच्या रक्कमेत होतेय दिवसेंदिवस वाढ

या उड्डाणपुलाच्या कामात निरंतर दिरंगाई होत आहे. त्यामुळे अपेक्षित खर्चाच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे पूर्वी हा उड्डाणपूल बोस्ट्रींग गडर प्रणाली अंतर्गत तयार करण्यात येणार हाेता. पण रेल्वे विभागाने तो नामंजूर करून ओपन वेब गडर प्रणाली अंतर्गत तयार करण्याचे सांगितले होते.

लॉचिंग स्कीम सबमिट करण्याकडे दुर्लक्षच

आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलासाठी अहमदनगर येथे गडर तयार करण्यात आले आहेत. परंतु, त्याची लाँचिंग स्कीम अद्यापही कंत्राटदाराकडून रेल्वे विभागाला सादर करण्यात आलेली नाही. कंत्राटदाराकडून लॉचिंग स्कीम सबमिट केल्यावर त्रयस्त समितीकडून या गडरची तपासणी करून रेल्वे विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांकडून मंजूरी घेतली जाणार आहे. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यावरच मेगा ब्लॉक घेऊन गडर लॉँच केले जाणार आहेत.

गडर लॉचिंग स्कीम सबमीट करण्याबाबतच्या लेखी सूचना आपण कंत्राटदाराला दिल्या आहेत. त्रयस्त समितीकडून तपासणी केल्यावर तसेच रेल्वे विभागाकडून मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष गडर लॉचं केले जाईल. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्णत्वास नेण्याचा आमचा मानस आहे. पण रेल्वे विभागाकडून मंजुरी मिळणे गरजेचे आहे.

- राजेंद्र आचार्य, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी