शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीचे प्रमाण अल्प असल्याने शेतकऱ्यांसमोर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:52 IST

खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडून लूट : गतवर्षीप्रमाणेच खरेदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खुल्या बाजारात कापूस, तूर, चणा व सोयाबीनचे भाव शासनाच्या हमीभावापेक्षा कमी झालेत. शासनाने हा शेतमाल हमीभावाने खरेदी करावा म्हणून शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेचा देखावा करीत शासनाने काही ठिकाणी तूर खरेदी सुरू केली, पण या केंद्रावर एकरी केवळ २ क्विंटल ६० किलो एवढीच तूर स्वीकारली जाते. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून शेतात पिकलेली सर्वच तूर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकरी करीत आहेत.कापूस हे पीक खर्चाला व मानवी श्रमाला न परवडणारे पीक असून आधी कापसाच्या पिकात मिश्रपीक म्हणून तुरीचे पीक घेणारा शेतकरी आता संपूर्ण शेतात तुरीचे एकमेव पीक घ्यायला लागला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच-सहा क्विंटल तुरीचे उत्पादन होते. जर शेतात कापसामध्ये मिश्र पीक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले तरी साधारण चार एकर शेतात कमीत कमी चार ते पाच क्विंटल तुरी पिकतात. शेतात तुरीचे एकमेव पीक असेल तर तलाठी धुरा व काही जागा कमी करून शेतातील तुरीचा पेरा सात बारावर नोंदवून देतो. पण कापसामध्ये मिश्रपीक म्हणून तुरी असली तर तलाठी केवळ २० ते २५ टक्के आराजी तुरीचे असल्याची नोंद करतो. अशावेळी शासनाच्या धोरणानुसार एकमेव तुरीचेच पीक असेल तर त्या शेतकºयांच्या शासकीय केंद्रावर १० क्विंटल ४० किलो एवढ्याच स्वीकारल्या जातात. तर चार एकरात कापसासोबत मिश्र पीक म्हणून तुरी लावल्या असतील तर अशा शेतकºयांच्या केवळ २ क्विंटल ६० किलो तुरी शासन स्वीकारते. यामुळे काही तुरी शासकीय खरेदी केंद्रावर नेल्यावरही उरलेल्या तुरी शेतकºयांनी कुठे विकाव्यात, हा प्रश्न उभा राहतो. या परिस्थितीमुळे व्यापाºयांचे फावत असून व्यापारी शेतकºयांना हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रुपयाचे क्विंटलमागे लुटत आहे. अधिक चौकशी केली असता शासकीय खरेदी केंद्रावरील अधिकारी यंदा दुष्काळ आहे, मग शेतकऱ्यांजवळ एवढ्या तुरी कशा आल्यात असा प्रश्न करतात. केंद्रावर येणाऱ्या तुरी ह्या सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांच्याच आहे ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल व कापसात मिश्र पीक घेणाऱ्यांना चार एकरात १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन झाले, ही परिस्थिती आहे. शासनाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही एकरी पाच क्विंटल या प्रमाणात तुरी खरेदी कराव्यात, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी