शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

By admin | Updated: October 16, 2015 02:58 IST

तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे.

जंगलातील झोपड्यांत राहतात ग्रामस्थ : वीज, पाणी, रस्ता आदी मूलभूत सुविधांचाही अभावसचिन देवतळे विरूळ (आ.)तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसह वन्य जीवांच्या धास्तीत ही कुटुंबे राहत आहे. शासन, प्रशासनाकडे निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना मुलभूत सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे. शासन, प्रशासनाच्या नजरेतून हरविलेले एक दुर्दैवी गाव म्हणूनच सध्या बोरीबाऱ्हा गावाचा उल्लेख होऊ लागला आहे. गत दोन वर्षांपासून येथील काही ग्रामस्थ जंगलात ठोकलेल्या झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. या ग्रामस्थांना अधिकारी मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपले गाव सोडले. तेव्हापासून त्यांना शासनाची कुठलीही मदत प्राप्त झाली नाही. बाऱ्हा येथील कुटुंबाचे पुनर्वसन न केल्याने त्यांना अंधाऱ्या रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सानिध्यात चिमुकल्यांसह जगावे लागत आहे. बोरीबाऱ्हा या गावात कोलाम आदिवासी बांधवांची वस्ती आहे. मोलमजुरी करून येथील नागरिक आपल्या संसाराचा गाडा हाकतात. बाऱ्हा गावाला लागून एक मोठा तलाव आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी हा तलाव तुडूंब भरला होता. तलाव फुटण्याच्या भीतीने प्रशासनाने बाऱ्हा येथील कुटुंबांचे स्थलांतरन करून एका शेतात पाल टाकून त्यांची निवासाची तात्पुरती व्यवस्था केली; पण कुठल्याही मुलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. यामुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना जंगलातच दिवस काढावे लागत आहे. या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजना पोहोचल्या नाही. काही दिवसांनी काहीच व्यवस्था नसल्याने काही ग्रामस्था परत आपल्या गावी राहायला गेले; पण काही कुटुंब अजूनही या जंगलात पाल टाकून वास्तव्यास आहेत. दोन वर्षांपासून हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप साधी वीजही येथे पोहोचली नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. उर्वरित कुटुंबेही पावसाळा सुरू झाला की, याच शेतात राहायला येतात. सध्या हे गाव पूर्णपणे भकास झाले आहे. गावात कुठल्याही सुविधा नाहीत. कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी बोरीबाऱ्हा ते विरूळ या रस्त्याची मागणी केली; पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांची रस्त्याची मागणीही पूर्ण होऊ शकली नाही. विरूळ हे बाजाराचे ठिकाण असल्याने त्यांना नेहमीच येथे ये-जा करावी लागते. पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून दोन किमीचा प्रवास करावा लागतो. राहायला घर नाही, वहिवाटीसाठी रस्ता नाही, रोगराई पसरल्यावर डॉक्टर नाही. यामुळे विरूळ वा पुलगाव येथे बैलबंडीने दवाखान्यात न्यावे लागते. अतिवृष्टी झाल्यास घरांना ओल चढते. यामुळे आजार पसरतात व वैद्यकीय सेवेसाठी भटकंती करावी लागते. येथील नागरिकांच्या हाताला काम नाही. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर आहे. पीक नाही, घरी लग्नाच्या मुली आहे; पण प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.