शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य वाटपाची चौकशी थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:23 IST

वर्धा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना द्यावयाचे साहित्याचे तब्बल आठ वर्षानंतर वितरण रातोरात पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणात पंचायत राज समितीच्या सुचनेनंतरही चौकशी प्रारंभ करण्यात आली नाही हे विशेष.

ठळक मुद्देपंचायत राज समितीचे आदेश : समाज कल्याण विभागातील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : वर्धा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना द्यावयाचे साहित्याचे तब्बल आठ वर्षानंतर वितरण रातोरात पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणात पंचायत राज समितीच्या सुचनेनंतरही चौकशी प्रारंभ करण्यात आली नाही हे विशेष.सन २०१० ते २०१५ सन २०१५ ते २०१६ या वर्षाचे साहित्य इतके वर्ष पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये पडून असल्याने त्यामध्ये काटेरी तार जिर्ण झाला. लाभार्थ्यांने शेतावर लावले असता त्याचे जागो जागी तुकडे पडत होते. तसेच शिलाई मशीन या इतके वर्ष जंगून पडल्यामुळे उपयोगात येण्याजोगे नव्हत्या.सदर प्रकार पंचायत राज समितीच्या समुद्रपूर पं. स. भेटी दरम्यान पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांना पं.स. सदस्य गजानन पारखी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून लक्षात आणूून दिला.या विषयावर पंचायत राज समितीच्या बैठकीमध्ये तब्बल २० मिनीटे चर्चा होवून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याबाबत लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करणे आठही पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आलेले साहित्य (मागील सात वर्षापासून साहित्य) लाभार्थ्यांस वेळीस वाटप केलेले नाही. यासाठी दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याची चौकशी करावी तसेच हे साहित्य पंचायत समितीस्तरावर इतके वर्ष का शिल्लक राहिले यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागातील कोणता अधिकारी जबाबदार आहे याची चौकशी करून अहवाल सादर करावा. तसेच समुद्रपूर पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी शंकर हेडावू यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कडून मागविण्यात यावा, अशा आशयाचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकाºयांना लेखी स्वरूपात दिले आहे.१८ दिवसाचा कालावधी उलटूनही या गंभीर प्रकरणाबाबत अजूनपावेतो कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. यावरून पंचायत राज समितीच्या आदेशालाही जि.प.चे अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र दिसून येते. सदर प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.दोनदा घडला पंचायत समितीत प्रकारसमुद्रपूर पंचायत समितीत यंदा दोनदा जुने साहित्य वाटण्याचा प्रकार घडला. जुन्या सायकली शाळेकरी विद्यार्थीनींना वाटण्यात आल्या. त्याच्या पालकांनी मिळालेले जंगलेले साहित्य कसेबसे घरी नेले. काही मुळींचा या जुन्या साहित्यामुळे हिरमोड झाला. या प्रकाराला पंचायत समितीचे अधिकारी जेवढे दोषी आहेत त्यापेक्षा अधिक दोषी जिल्हा परिषदेचे अधिकारी दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी आहे.