लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. मंगळवारला चिकणी-पडेगाव दरम्यान बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांनाच बसला धक्का देण्याची वेळ आली.पडेगाव या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळ आहे. वर्धा-देवळी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावात बससेवा सुरळीत नव्हती. सदर गाव मुख्य मार्गावर नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांना ३ कि़मी. अंतर चालत येऊन चिकणी येथून बस घ्यावी लागत. शंभराहुन अधिक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. तसेच देवळी ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांना खरेदीकरिता येथेच यावे लागते. वारंवार मागणी केल्यावर दोन वर्षापूर्वी वर्धा ते राळेगाव यशवंती बस सुरू करण्यात आली. मात्र ही बससेवा विद्यार्थी व्व व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे वारंवार दिसून आले.ही बस अनेकदा उशिराने येते तर कधी येतच नाही. कधी तर रस्त्यातच नादुरूस्त होते. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची ताटकळ होते. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी व प्रवाशांना सहन करावा लागतो. असाच प्रकार मंगळवार दि. २ जानेवारीला घडला. दुपारी १२ वाजता येणारी राळेगाव-वर्धा यशवंती बस चिकणी-पडेगाव मार्गावर नादुरूस्त होवून बंद पडली. भुकेने व्याकुळ झालेले विद्यार्थी बराच वेळ बसकरिता ताटकळत होते. अखेर ही बस सुरू न झाल्याने दुसरी बस बोलविल्यावर प्रवाशांची सुटका झाली.भंगार बसेस न सोडण्याची ग्रामस्थांची विनंतीबस बंद पडल्यावर चालकाच्या विनंतीवरून प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसला धक्का दिला. मात्र बस सुरू करण्याचा हा प्रयत्न असफल ठरला. वर्धा विभागाला माहिती दिल्यावर दुसरी बस बोलविण्यात आली. तर नादुरूस्त बसला दोरी बांधून वर्धा येथे नेण्यात आले. प्रवासी व विद्यार्थ्यांना मात्र गावापर्यंत पायपीट करावी लागली. गावात भंगार बसेस सोडू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
‘यशवंती’ला दे धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:49 PM
दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.
ठळक मुद्देभंगार बसेसचा भरणा : विद्यार्थ्यांना करावी लागली पायपीट