लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विना अनुदानीत शाळेतील शिक्षक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील विधानसभेवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित मंत्र्यांना सादर केले. निवेदनातून मांडण्यात आलेल्या समस्यांवर योग्य निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी केली. पार पडलेल्या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.निवृत्त पोलिसांच्या मागण्या निकाली काढावर्धा : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा जिल्हा तसेच पोलीस बॉईज असोसिएशन संलग्नित महिलांचा संयुक्त मोर्चाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून सेवानिवृत्त पोलिसांना व सेवेत असलेल्या पोलिसांना केंद्रीय आरोग्य सेवा योजना महाराष्ट्रात लागू करावी. निवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण देण्यात यावे. आठ तासांच्यावर काम करणाऱ्या पोलिसांना ओव्हर टाईम भत्ता देण्यात यावा. २००५ नंतर रुजू झालेल्या पोलिसांना जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चाचे नेतृत्त्व सुरेश बोरकर, हरिगणेश वांदीले, जानराव लोणकर, किशोर ढोणे, वर्षा मारबते यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन ना. एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले. या मोर्चात रविंद्र कानफ ाडे, व्यंकट बुंदे, वैकूंठा उईके, गंगाधर गेडाम, अमृत मडावी, सुरेश भोयर, वासुदेव बोंदरे, मोरेश्वर तेलरांधे, इस्ताक खान, राजकुमार बारी, रमेश गुरनुले, विजय खोब्रागडे, प्रकाश भोयर, वंदना नगराळे, सविता बावणे, शोभा परचाके, शालिनी मुन, शैला पाटील, प्रभा किरनाके, पुजा कांबळे, मंगला करनाके, अर्चणा नक्षिणे आदी सहभागी झाले.कंत्राटी परिचारीकांना कायम करावर्धा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विधी मंडळावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी कंत्राटी परिचारीकांच्या विविध मागण्यांचे निवेदन ना. जयंत पाटील यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या कंत्राटी नर्सेस व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सवताची वागणूक न देता त्यांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या. रिक्त पद तातडीने भरण्यात यावी. विनंती बदलीचे प्रकरणे निकाली काढण्यात यावे. समाधानकारक वेतन देण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्त्व राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे, आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, संगीता रेवडे, भारती मून, स्वप्नाली ठवकर, प्रतिमा मेश्राम, हौसलाल रंहागडाले यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.
विधानसभेवर धडक; मांडल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून सेवानिवृत्त पोलिसांना व सेवेत असलेल्या पोलिसांना केंद्रीय आरोग्य सेवा योजना महाराष्ट्रात लागू करावी. निवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण देण्यात यावे. आठ तासांच्यावर काम करणाऱ्या पोलिसांना ओव्हर टाईम भत्ता देण्यात यावा.
विधानसभेवर धडक; मांडल्या समस्या
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशन : विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना निवेदन सादर