महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत टोकण धारक अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री केल्याचे पुढे आले आहे. तर आतापर्यंत टोकण धारकांसह इतर १ लाख ७३ हजार ७१९ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ३१.९४ लाख क्विंटल कापूस सीसीआय आणि कापूस पणन महासंघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सध्यास्थितीत वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस वर्धा जिल्ह्यातील सीसीआय आणि कापूस पणन महासंघाच्या केंद्रांवर खरेदी केला जात आहे.खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कापूस खरेदी केंद्र गाठून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच संबंधितांना सूचना केल्या. परिणामी, अवघ्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचून त्याची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ७१९ शेतकऱ्यांचा ३१ लाख ९४ हजार ८६६.७० क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यात सीसीआची खरेदी अंतिम टप्प्यात आहे.१२,६४३ शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशातसीसीआय व कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी तब्बल ५० हजार १३४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून नोंदणी केली होती; पण लॉकडाऊननंतरही अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक असल्याची ओरड झाल्याने अचूक माहिती घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान टोकण धारक तब्बल १२ हजार ६४३ शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकल्याची बाब पुढे आल्याने त्यांचे टोकण रद्द करण्यात आले आहे. यावर्षी व्यापाऱ्यांचा कापसाचा भाव २ हजार ८०० ते ४ हजार ३०० होता. त्यामुळे अनेकांनी सीसीआयलाच कापूस देणे पसंत केले.पणनचे दोन तर सीसीआयचे दहा केंद्रकापूस पणन महासंघाच्या दोन तर सीसीआयच्या दहा केंद्रांवर कापूस खरेदी केला जात आहे. २,४५२ शेतकरी शिल्लक असून जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी कापूस विकल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शिल्लक असलेल्या २ हजार ४५२ शेतकऱ्यांपैकी काहींनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.बाहेर जिल्ह्यातील ७३९ शेतकऱ्यांचा खरेदी होतोय कापूसअमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या पुलगाव आणि देवळी येथील केंद्रांवर तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील शेतकऱ्यांचा कापूस सेलू येथील केंद्रावर सध्या खरेदी केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील २५५, यवतमाळ जिल्ह्यातील ३२९ तर नागपूर जिल्ह्यातील १५५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले.
३१.९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST
खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कापूस खरेदी केंद्र गाठून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.
३१.९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी
ठळक मुद्देनागपूर, अमरावती, यवतमाळातील शेतकऱ्यांच्या कापसाची आवक सुरू