शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पुलफैलात ‘वॉश आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:08 IST

शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देशहर पोलिसांची कारवाई : १.३९ लाखांचा दारूसाठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.प्राप्त माहितीनुसार, पुलफैल येथील शुभम सदानंन काळे रा.पुलफैल हा गावठी दारूची निर्मिती करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. पोलिसांनीया कारवाईत २० प्लास्टीक कॅन मधील सुमारे २ हजार लिटर कच्चा मोह रसायन सडवा, दोन लोखंडी ड्रम मधील २०० लिटर उकळता मोह रसायन सडवा, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लोखंडी ड्रम, दोन घमिले, गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात नितनवरे, बाबाराव बोरकुटे, दिनेश तुमाने, अमरदीप पाटील, गितेश देवघरे, धर्मराज पटले, प्रेमदेव सराटे यांनी केली.शिवनी पारधी बेड्यावरील दारू विके्रत्यांवर कारवाईसमुद्रपूर : शिवनी पारधी बेड्यावर मोठ्या गावठी दारू निर्मिती करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समुद्रपूर पोलिसांनी आज केलेल्या वॉश आऊट मोहिमेदरम्यान उजेडात आला आहे. पोलिसांनी या भागात वॉश आऊट मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कच्चा मोह रसायन सडवा आणि गावठी मोह दारू ताब्यात घेवून ती नष्ट केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई समुद्रपूरचे ठाणेदार यांच्या प्रत्यक्ष हजेरीत अरविंद येनूरकर, राजेंद्र ठाकरे, नारायण काळे, धनंजय पांडे, रुपचंद भगत, रवी पुरोहित, चेतन पिसे, अजय वानखेडे, वैभव जगणे, वीरेंद्र कांबळे आदींनी केली.अट्टल दारूविक्रेत्याला ठोकल्या बेड्याआकोली : सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल दारूविक्रेता अशी ओळख असलेल्या विशाल रंगारी याला दारूविक्री करीत असताना सेलू पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दारूसाठा जप्त केला आहे. यापूर्वी जमादार अर्जुन दिक्षित तसेच शिपाई मनिष कांबळे यांनी आरोपी विशाल रंगारी याच्या मालकीची सुरगाव शिवारातील दारूभट्टी उद्ध्वस्त केली होती. विशाल रंगारी याच्याविरुद्ध दारूविक्री, निर्मिती तसेच दारूतस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याचा शोध अनेक दिवसांपासून पोलीस घेत होते.अखेर त्याला बेड्या ठोकण्यात सेलू पोलिसांना यश आले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी