शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

40 झोपड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागानं चालवला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:36 IST

बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या.

वर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या. अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढावे, अशी नोटीस यापूर्वी सा. बां. विभागाच्या वतीने सदर झोपडी मालकांना बजावला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर यांच्या नेतृत्वात सा. बां. विभागाची चमू जेसीबीसह बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल परिसरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहोचले. सुरुवातीला अतिक्रमण धारक नागरिकांकडून पहिले राहण्यासाठी जागा द्या नंतरच अतिक्रमण काढा, अशी विनंती करण्यात आली. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी तुम्हाला न. प. ने स्मशानभूमी परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. तेथे तुम्ही राहण्यासाठी जावे, असे सांगितले. त्यानंतर तणावपूर्ण शांततेत पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली. दुपारी २ वाजेपर्यंत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सुमारे २५ झोपड्या सा. बां. विभागाच्या अधिका-यांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडल्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यामुळे ही कारवाई दुपारी २ वाजताच्या सुमारास थांबविण्यात आली.संसार आला उघड्यावरअतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना सदर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात सा.बां.वि.च्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी जेसीबीच्या सहाय्याने दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे २५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या प्रकारामुळे सदर २५ जणांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. आचार्य विनोबा भावे उड्डणपूल परिसरात अतिक्रमण करून राहणा-यांना तात्काळ पक्के घरे बांधून देण्यात यावी, अशी मागणी अतिक्रमण धारकांची आहे.पाच दिवसात अतिक्रमण न काढल्यास पुन्हा राबविणार मोहीमजिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली आहे. येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास पाच दिवसानंतर सा.बां.विभागाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून थांबली अतिक्रमण हटाव मोहीमअतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे यावर अतिक्रमण धारकांनी होकार दर्शविल्याने जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.स्मशानभूमी भागातील जागा पंतप्रधान आवास योजनेसाठीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत स्मशानभूमी परिसरातील जागा अतिक्रमण धारकांना देण्यासाठी न.प.ने मौखिक होकार दर्शविला आहे. सदर जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पक्क घर बांधून देण्यासाठी न.प.ने ठराव घेतला असल्याचे न.प.तील एका अधिका-याने सांगितले.