शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक विहीर, रस्त्यावर स्लॅब टाकून केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 22:18 IST

भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देबोरगाव (मेघे) येथील प्रकार । प्रशासनाकडून मात्र कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.बोरगाव येथे प्रमोद रामदास रामटेके यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. मंजुरीपूर्वी ग्रामपंचायतीकडून कुठलीही शहानिशा करण्यात आली नाही. घरकुलधारकाने सुमारे शंभर वर्षांपासून यामुळे वहिवाट असलेल्या सहा फूट रुंद रस्त्यावर अतिक्रमण करून अवैधरीत्या बांधकाम केले. एवढ्यावरच ते थांबले नाही तर पाणीपुरवठ्याच्या सार्वजनिक विहिरीवर स्लॅब टाकून नागरिकांचे पाणी भरणे बंद केले. याबाबत परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून जिलधिकाऱ्यांनी संबंधितांना चौकशीचे निर्देश दिले. लोकसेवकांना घटनास्थळी उपस्थित राहण्याबाबत नोटीसही दिली. मात्र, चौकशीचे काय झाले, हे कुणालाही समजले नाही. सद्यस्थितीत प्रकरण थंडबस्त्यात आहे. विहिरीवर अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमणकर्त्याला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामस्थांनी निवेदनातून रस्ता आणि विहीर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली. दुसरीकडे अतिक्रमणधारक ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयातून बांधकामाचा धनादेश घेण्यासाठी खटाटोप करीत आहे. न्याय मिळवून देण्याची नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणwater shortageपाणीटंचाई