वर्धा : ग्रा़पं़ च्या विभाजनामुळे तसेच मुदत संपल्यामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रा़पं़ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.वर्धा जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम गुरूवार दि. १५ जानेवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये जुलै ते डिसेंबर २०१५ यास कालावधीत मुदत संपणाऱ्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा समावेश आहे.ग्रामपंचायत मधील एकूण सदस्य संख्या ठरविणे व प्रारूप प्रभाग रचना करणे यासाठी गुरूवार दि. १५ जानेवारी २०१५, प्रारूप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकाऱ्याने मंगळवार दि. २० जानेवारी रोजी मान्यता देण्यात यावी. बुधवार दि. २८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्यांची संख्या, प्रभाग विभाजन करणे व जागा राखून ठेवणे तसेच आरक्षणासाठी सोडत पद्धतीने आरक्षण ठरविणे. गुरूवार दि. २९ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्यांची संख्या प्रभागात विभाजन करणे व जागा राखून संदर्भात हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करणे तसेच गुरूवार, दि. ५ फेबु्रवारी रोजी या संदर्भात हरकती सादर करण्याची अंतिम तारीख राहील. सोमवारी दि. ९ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिनियमानुसार मागविलेल्या हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिनियमाच्या नियम ५ अनुसार नमुना ‘अ’ मध्ये अंतिम प्रभाग रचना, आरक्षित जागा आदी तपशील प्रसिद्ध करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी कळविले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
५० ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभाग आरक्षण जाहीर
By admin | Updated: January 20, 2015 22:40 IST