शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१४४ प्रकरणांचा लोकअदालतीत निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:42 IST

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व न्यायालयात सुनावणी : २ कोटींवर रकमेचे दावे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७१ प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करण्यात आला. २ कोटींवर अधिक रकमेची वसूली या न्यायालयाच्या निवाड्यातून करण्यात आली. जिल्ह्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणांपैकी ७१ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. सदर प्रकरणांमध्ये २ कोटी ४३ लाख ६१ हजार ८४३ रूपये मुल्य होते. तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ७३ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. वाद दाखलपूर्व प्रकरणामधील निकाली काढलेल्या तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ६ लाख ३० हजार ३३२ इतके होते. न्यायालयीन प्रलंबीत प्रकरण व वाद दाखलपूर्व प्रकरणे मिळवून १४४ प्रकरणे निकाली काढण्यात आले. याचे तडजोड मुल्य २ कोटी ४९ लाख ९२ हजार २१५ रूपये इतके आहे.राष्ट्रीय लोकअदालतीचा मुख्य उद्देश म्हणजे न्यायालयात प्रलंबीत प्रकरणाचा आणि वाद दाखलपूर्व प्रकरणाचा जास्तीत जास्त निपटारा करणे होय. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकाराचा वेळ व पैसा याची बचत होवून पक्षांना मानसिक समाधान मिळते. तसेच आपसी समझोत्यामुळे तडा गेलेल्या व दुरावा निर्माण झालेल्या संबंधाना जोडण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधीकरणच्या जिल्हाध्यक्ष एम.जे. थोटे यांनी केले. वर्धा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सर्व जिल्हा न्यायाधीश, सर्व दिवाणी न्यायाधीश, जिल्हा शासकीय अभियोक्ता व अभियोक्ता संघाचे अध्यक्ष तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नि.उ. परमा उपस्थित होते.

टॅग्स :Lokadalatलोकअदालत