केळझर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सेलू अंतर्गत घर तेथे शौचालय कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांत शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला जि़ प़ अधिकारी, विस्तार अधिकारी पं़ स़ सेलू कांबळे, निमजे, ग्राम विकास अधिकारी जी़ बी़ उमाटे, प्रभाग समन्वयक हेमंत काकडे, संघटिका वर्षा ढोले आदी उपस्थित होते़ यावेळी जि़ प़ सर्कल केळझर प्रभागातील एकचक्रीनगर ग्रामसेवा संघातील वीस महिला बचत गटाच्या महिलांनी सहभागी होत प्रशिक्षण घेतले. सभेला संबोधित करताना सेलू पं़ स़ गटविकास अधिकारी मोकाशी यांनी प्रत्येक घरी शौचालय असण्याचे महत्त्व पटवून दिले़ तसेच उघड्यावर प्रात:विधी केल्याने पसरणारी रोगराई, त्यातून निर्माण होणार्या आरोग्यविषय समस्या आदींवर इत्यंभूत माहिती दिली़ एवढेच नाही तर उघड्यावर शौचाला बसणे, हे कुटुंबाकरिता व गावाकरिता लाजीरवाणी बाब असल्याचे सांगितले़ शिवाय शासन घरी शौचालय बांधण्यासाठी दहा हजार रूपये अनुदान देत असून ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा कुटुंबांनी लाभ घेण्याचे आवाहन केले़ यावेळी गावकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सत्यवान नखाते यासह महिला सदस्यांनी सहकार्य केले़(वार्ताहर)
‘घर तेथे शौचालय’ योजनेवर जनजागृती कार्यक्रम
By admin | Updated: May 17, 2014 23:49 IST