वर्धा : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील ३० गावामध्ये शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.कृषी विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात सेलू तालुक्यातील ३० गावामध्ये संबंधित गावातील कृषी विभाग, जलसंपदा विभाग, महसूल, लघुसिंचन, ग्रामविकास विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी व शेतकरी शिवारफेरीत सहभागी झाले होते.शिवारफेरीत ग्रामस्थाना पाण्याचे महत्त्व तसेच पडणाऱ्या पावसाचा ताळेबंद तयार करून जास्तीत जास्त पाणी मृद व जलसंधारणाचे उपाययोजनेद्वारे जमीनीत जिरविणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सेलू तालुक्यातील सोंडी व सालई कला या गावातील शिवारफेरीमध्ये जि.प. सदस्य विरेंद्र रणनवरे, तहसीलदार संगीता राठोड, तालुका कृषी अधिकारी बी.के. वाघमारे, मंडळ अधिकारी आर.एस. जांवधिया, कृ.स. तलाठी सी.पी.बिरे, ग्रामसेवक व शेतकरी सहभागी झाले होते. तसेच तामसवाडा व मदनी येथे तहसीलदार गटविकास अधिकारी पल्लवी राजेश व इतर यंत्रणाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
जलयुक्त अभियानांतर्गत ३० गावात जनजागृती
By admin | Updated: January 8, 2015 23:00 IST