शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

न्याय्य हक्कांसाठी पं.स. लोकप्रतिनिधी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:39 IST

शासनाच्या तुघलकी कारभारामुळे ग्रामीण भागात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या पं. स. सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हवालदिल झाले आहे. शिवाय हे लोकप्रतिनिधी केवळ नामधारीच राहिल्याचा आरोप करीत जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी पं. स. च्या लोकप्रतिनिधींना सरकारने योग्य अधिकार द्यावे ......

ठळक मुद्देसदस्यांना अधिकार द्या : विदर्भातील पहिली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्या तुघलकी कारभारामुळे ग्रामीण भागात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या पं. स. सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हवालदिल झाले आहे. शिवाय हे लोकप्रतिनिधी केवळ नामधारीच राहिल्याचा आरोप करीत जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी पं. स. च्या लोकप्रतिनिधींना सरकारने योग्य अधिकार द्यावे या मुख्य मागणीसाठी मंगळवारी वर्धा पं.स.च्या सभागृहात जिल्ह्यातील पं. स. सभापती, उपसभापती व पं. स. सदस्यांची विदर्भातील जिल्हास्तरीय बैठक पार पडली. पं.स.तील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपल्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्र्यांना सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय यावेळी घेतला. मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राज्यातील सुमारे चार हजार पं.स. लोकप्रतिनिधी आपले राजीनामे त्यांना सादर करणार आहेत.पं. स. सदस्यांना पूर्वी आप-आपल्या परिसरात विकास कामे करण्यासाठी निधी मंजूर होत होता. परंतु, सरकारच्या नवीन निर्णयानुसार हा निधीच मिळणे बंद झाला आहे. त्यामुळे जनतेने सुचविलेली कामे पूर्ण करण्यासाठी पं.स.तील लोकप्रतिनिधींना बड्या लोकप्रतिनिधींच्या दरबारातच जावे लागते. पूर्वी प्रमाणे पं. स. सदस्यांना विकास कामे करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. निवडून आलेले पं.स. सदस्य हे त्या-त्या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील लोकांचे प्रतिनिधीत्त्व करतात. सदर लोकप्रतिनिधींना त्यांचा अधिकार देण्यात यावा. सर्व पं.स. सदस्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात यावा आदी मागण्या सरकार दरबारी रेटण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सरते शेवटी आपल्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना सामूहिक राजीमाने देण्याचा तसेच त्यावरही योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा निर्णय याप्रसंगी सर्वसम्मतीने घेण्यात आला. व्यासपीठावर वर्धा पं.स.च्या सभापती महानंदा ताकसांडे, देवळीच्या विद्या भुजाडे, पं.स. उपसभापती सुभाष चांभारे, उस्माना जिल्ह्यातील तुळजापूर येथील पं.स. सदस्य दत्तात्रय शिंदे, बिड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील पं.स. सदस्य शिरीष पटेल, उस्मानाबाद येथील पं.स. सदस्य गजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक पं.स. सदस्य राजेश राजुरकर यांनी केले. बैठकीला सुभाष चांभारे, प्रफुल माटे, प्रशांत भगत, प्रशांत चंदनखेडे, वैशाली पुरके, अमोल गायकवाड, विजय खोडे, अमित गावंडे आदींची उपस्थिती होती.चार हजार सर्वपक्षीय पं.स. सदस्य देणार राजीनामेआपल्या न्याय्य हक्कासाठी व जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी राज्यातील पं.स. सदस्य, सभापती व उपसभापतींनी संगटित होऊन लढा देण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा हा लढा कुठल्याही राजकीय पक्षासह सत्ताधाºयांविरुद्ध नसून शासनाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. विविध पक्षाचे तसेच अपक्ष राज्यातील सुमारे ४ हजार पं.स. सदस्य संघटित होऊन मुख्यमंत्र्यांना आपापले राजीनामे देणार आहेत.जनजागृतीसाठी मराठवाडा अन् पश्चिम महाराष्ट्र काढला पिंजूनज्या विषयांना अनुसरून मंगळवारी वर्धा पं.स.च्या सभागृहात जिल्हास्तरीय पं.स.तील लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली याच विषयाला अनुसरून यापूर्वी महाराष्ट्रातील मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बैठका पार पडल्या आहेत. या दोन्ही परिसरातील सर्व पक्षीय पं.स. सभापती, उपसभापती तसेच पं.स. सदस्यांनी न्याय हक्कासाठी मुख्यमंत्र्यांना राजीनामे देण्याचे मान्य केले असल्याचे यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती