शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:40 IST

महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०१६-२०१७ चा ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्ह्यातून दोघांची वर्णी : शिक्षणमंत्र्यांनी केले सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०१६-२०१७ चा ‘राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख उपस्थितीत होते. सोमवारी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात एका शासकीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनातर्फे विविध क्षेत्रातील १०७ शिक्षकांना प्रत्येकी प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यात नागपूर विभागातून एकूण १८ शिक्षकांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक विभागातून आर्वी तालुक्यातील शिरपूर येथील मारोती गणपत विरुरकर तर माध्यमिक व उच्च माध्य. विभागातून देवळीच्या एसएसएने महाविद्यालयातील कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने कॅप्टन गुजरकर यांनी होमगार्डसचे जिल्हा समादेशक म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे चार वेळा ‘शौर्य पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना स्काऊट क्षेत्राकरिता ‘उपराष्ट्रपती पुरस्कार’ व लक्ष्मी मुजूमदार राष्ट्रीय पुरस्कार तथा राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘बेस्ट एनसीसी अधिकारी’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.