सुधीर मुनगंटीवार : फिरत्या मॅमोग्राफी वाहनाचे लोकार्पणवर्धा : कर्करुग्णांना उत्तम दर्जाची रुग्णसेवा पुरविण्याचा संकल्प करावा. तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा जनतेपर्यंत कशा पोहचविता येतील यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुुधीर मुनगंटीवार यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था व रोटरी क्लब आॅफ गांधी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने फिरती मॅमोग्रामी मोबाईल व्हॅनचे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार याच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी गणेशाची आरतीही केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर मेघे, रोटरीचे प्रांतपाल डॉ. निखील किबे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजीव बोरले, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निर्वाचित प्रांतपाल महेश मोकलकर, माजी प्रांतपाल किशोर केडिया व्यासपीठावर उपस्थिती होते.
कर्करुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवा
By admin | Updated: September 27, 2015 01:32 IST