शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST

जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजकडून ऊसाची उशिरा तोड केली जात असल्याने उभ्या पिकाची वन्यप्राणी नासाडी करीत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रेहकी शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.रेहकी शिवारात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु, करारानुसार संबंधितांकडून ऊसतोड करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. यामुळेच मिळणाऱ्या मोबदल्यातही घट होत आहे. उसाची तोड निर्धारित वेळेत झाली तर दुसरे उत्पादनही घेता येते, परंतु त्यातही नुकसान होत आहे. तसेच शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाला जंगली जनावरांपासून भयंकर त्रास असून तेसुद्धा पिकाला नुकसान पोहचवित आहे.दुहेरी नुकसानामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले असून वनविभागाकडून व साखर कारखान्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर सुरेश लाडे, फुलचंद झाडे, दामोदर झाडे, संजय घुमडे, गणेश झाडे, अशोक रघाटाटे, रवींद्र शिंदे, राजू पोहणे, देवराव हुडे, नामदेव शिंदे, श्रीकांत धानकुटे, सुरेश झाडे, संजय रघाटाटे, पुरुषोत्तम घुमडे, रवींद्र सावरकर, भास्कर मुजबैले यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.रेहकीत नुकसानीचे सर्वेक्षणशेतपिक नुकसानीच्या प्रकरणाला प्राथमिकता दिली जाते, कार्यालयात एकही प्रकरण प्रलंबित नाही, अर्ज आल्याबरोबर प्रकरणावर त्वरित कारवाई करण्यात येते. आज पासूनच रेहकी शिवारात शेतपिक नुकसानाचे सर्व्हे सुरू करण्यात आले आहेत. जंगली जनावरांनी नुकसान केल्याचे आढळून आल्यास त्या शेतकऱ्यास शासन नियमाप्रमाणे तातडीने भरपाई देण्यात येईल, असे झडशी सहवन क्षेत्राचे क्षेत्राधिकारी कमलाकर वाटकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी