लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा- हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा शहरात गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा ठाकरे मार्केट, सोशालिस्ट चौक मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, तरूणी, विद्यार्थी, नागरिक व सामाजिक, शिक्षक संघटनांनाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मोर्चेकरांच्या वतीने पाच मुलींनी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
हिंगणघाट प्रकरणी वर्धा शहरात निघाला निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:55 IST