शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग; ग्रामपंचायतीला हस्तांतरील केलेल्या जमिनीवरील ५० हजार झाडे भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 15:15 IST

समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली.

ठळक मुद्देअ‍ॅफकॉन्सचा प्रताप मनमर्जीने केले रोपवनात उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली. या उत्खननादरम्यान ३० वर्षांची तब्बल ५० हजार २२५ डेरेदार झाड भूईसपाट केली आहे. उल्लेखनीय म्हणजे साधे एक झाड विना परवानगी कापणाऱ्या शेतकऱ्यांवर वनगुन्हा दाखल केला जातो. पण अद्यापही अ‍ॅफकॉन्स कंपनीसह त्याच्या उपकंत्राटदारावर वृक्षकत्तलीबाबतचा साधा वनगुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या हे प्रकरण वृक्षपे्रमींसाठी संशोधनाचा विषय ठरत आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवड मोहीम राबविणारी शासकीय यंत्रणा या प्रकरणात गप्प बसली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजा इटाळा (ग्रा.:पं.महाबळा) येथील शेत सर्व्हे नंबर ७ आराजी ३८.३९ हे. आर. मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने १९८८ ला ३४४०० रोपटे लावली. त्याचे तीन वर्षे संगोपण करून जगलेली ७७ टक्के म्हणजे २६ हजार ६८२ झाडे नियमानुसार महाबळा ग्रामपंचातीला ४ जून १९९१ ला संवर्धनासाठी हस्तांतरीत केली. तसेच मौजा कोटंबा येथील शेत स. न. २१० (सरकारी जमीन) आराजी ११.१२ हे. आर. तसेच स. न. २०६ (वनविभाग महाराष्ट्र शासन) आराजी ४.६८ हे.आर. या जमीनीवर सन १९८९ ला सागवनासह इतर प्रजातींचे मौल्यवान १५ हजार २०० रोपे लावली. तिचे सामाजिक वनीकरणने संगोपन करून तीन वर्षानंतर जीवंत राहिलेली १० हजार ८७६ (७१.०५ टक्के) झाडे ग्रा.पं. कोटंबाला १९ फेबु्रवारी १९९२ ला हस्तांतरीत केली. पण सदर वृक्ष कमी मेहनतीत जादा मुनाफा कमविण्याच्या लोभात आणि समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन्स कंपनीने पर्यावरणाचा ºहास करण्याचा विडा उललल्यागत केलेल्या उत्खननादरम्यान जमिनदोस्त करण्यात आली आहे. मौजा कोटंबा येथील शेत स.न. २९३/१ व २९३/२ (वनविभाग महाराष्ट्र शासन) या जमिनीतही विना परवानगी उत्खनन झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग