शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोर बफर झोन एकसंघ नियंत्रणाचा प्रस्ताव रखडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 05:34 IST

देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प

- महेश सायखेडे लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प’ अशी ओळख असलेल्या बोर प्रकल्पाच्या बफर झोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाईड कंट्रोल) प्रस्ताव काही वर्षांपासून धूळ खात पडला आहे. या प्रकल्पाचा बफर झोन २०१५ मध्ये जाहीर करण्यात आला असून त्याचे एकसंघ नियंत्रण हे वन्यजीवांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी महत्त्वाचे आहे.

सेलू तालुक्यातील या प्रकल्पात सहा प्राैढ वाघ, दहा-बारा बिबटे, ३५ अस्वली, २६ हून जास्त रानकुत्री, हजारोंच्या संख्येने सांबर, चितळ, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. हा प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत आहे. प्रकल्पाचा कोअर झोन १३,८०० हेक्टर तर बफर झोन ६७,८१४ हेक्टर आहे पण बफर झोनची जबाबदारी सध्या प्रादेशिक वनविभागाकडे आहे. आपत्कालीन परिस्थितीत ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची अनेकदा तारांबळ उडते. त्यामुळे बफर झोनचे एकसंघ नियंत्रण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

हा फायदा होणारबोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास या परिसराचे नियंत्रण हे वन्यजीव विभागाकडे येऊन मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहेत.

प्रस्तावाचा प्रवासउपवनसंरक्षक, वर्धा यांनी ८ मे २०२० रोजी एकसंघ नियंत्रणाचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांना पाठविला. या कार्यालयाने तो कार्यवाही करून २१ मे २०२० रोजी अप्पर प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) यांना पाठविला. या कार्यालयाने हा प्रस्ताव शासनाला सादर केला.